भारतीय प्रमुख क्रिकेटपटूंना कधी न मिळणारी मोलाची सुट्टी संपली आहे आणि भल्यामोठ्या क्रिकेट मोसमाला सुरुवात होत आहे. १९ सप्टेंबरला भारतीय संघ मोसमातील पहिला कसोटी सामना बांगलादेश संघासमोर खेळणार असून मोसमाची सांगता भारतीय संघाच्या इंग्लंड दौर्यातील पाच कसोटी सामन्यांनी होणार आहे.