श्री कांची कामकोटी पीठम, कांचीपुरम (तामिळनाडू) श्री ब्रह्मीभूत चित्तसुखेंद्र सरस्वती या २४ व्या शंकराचार्यांचा ३१ ऑगस्ट २०२१ हा आराधना दिवस आहे, त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा हा लेखाजोगा : वेदाचार्य रवींद्र पैठणे
भारतीय सनातन वैदिक धर्म लुप्त प्राय होत असताना श्री जगद्गुरू पूज्यपाद आदी शंकराचार्य यांचा अवतार २५०० वर्षांपूर्वी झाला. सनातन वैदिक हिंदू धर्माच्या उद्धाराकरिता आदी शंकराचार्यांनी भारत भ्रमण करून नास्तिकवाद संपवला.
पुन्हा सनातन धर्माची प्रतिष्ठापना केली. या परंपरेमध्ये मूलाम्नाय सर्वज्ञ श्री. मठ कांची कामकोटी पीठाची स्थापना चार दिशेला चार मठ स्थापन केले. नंतर कांची कामकोटी येथे कामाक्षी देवीची उपासना करून समाधिस्थ झाले. त्यानंतर कांची कामकोटी श्री मठ स्थापन करू पीठाधीश्वर गुरू परंपरा सुरू झाली. कांची कामकोटी गुरु-शिष्य परंपरेत परम तपस्वी ब्रह्मलीन श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य परम आचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती महास्वामींनी तपस्या करून जगद उद्धाराचे खूप मोठे कार्य केले. त्यानंतर या मठास लोकाभिमुख करून स्थैर्य प्राप्त करून देणारे ब्रह्मीभूत जगद्गुरू शंकराचार्य जयेंद्र सरस्वती स्वामीजी होऊन गेले. आज जगद्गुरू शंकराचार्य कांची कामकोटि पीठाधीश्वर, शंकर विजयेंद्र सरस्वती महास्वामीजी लोकोद्धाराची लोकांचे दुःख दूर करण्याची परंपरा सनातन धर्म वैदिक धर्म संरक्षण व संवर्धनाचे कार्य समर्थपणे चालवीत आहे.
श्री. कांची कामकोटी मठ हा एकमेव शंकराचार्य मठ आहे. ज्यात गेल्या २५२० वर्षांपासून अखंड गुरु शिष्य परंपरा आहे. सध्याचे शंकराचार्य ७० वे गुरु श्री शंकर विजयेंद्र सरस्वती आहेत. २४ वे शंकराचार्य श्री ब्रह्मलीन आचार्य शंकर चित्तसुखेन्द्र सरस्वती हे एक महान महागणपती उपासक होते. जे ५१२ ते ५२७ इ. पू. (सुमारे १५०० वर्षांपूर्वी) कांचीपुरम शंकराचार्य म्हणून जगले. शंकराचार्य म्हणून त्यांच्या आयुष्यात त्यांनी कोकण प्रदेशात दररोज शिव उपासना आणि हिंदू धर्माचा प्रचार करण्यात वेळ घालवला. त्यांच्या शेवटच्या दिवसात ते महाराष्ट्रातील गणपतीपुळे येथे राहायला गेले. जिथे त्यांनी गणपतीच्या मंदिरासमोर समाधी घेतली. जिथे त्यांनी प्रार्थना केली आणि ध्यान केले.
मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजाबाहेर हे समाधी स्थळ आपण पाहू शकता. अशा या महान परंपरेतील आचार्य शंकर चित्तसुखेन्द्र सरस्वती यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने अशा या महान विभूतींची आठवणीनिमित्त हा प्रपंच. पूज्य स्वामीजींच्या श्री चरणी कोटी कोटी वंदन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.