- सायली केदार, sayalijk@gmail.com
गायक-अभिनेता दिलजीत दोसांज याच्या गाण्यातील दारू आणि ड्रग्जसारख्या शब्दावर तेलंगण सरकारने आक्षेप घेतला. निर्व्यसनी असल्याचा दावा करणाऱ्या दिलजीतनेही सरकार भारतभर दारूबंदी करायला तयार असेल, तर मीसुद्धा असे शब्द असलेली गाणी टाळेन, असं थेट आव्हान दिलं... पण सध्याची परिस्थिती पाहता दिलजीतच्या गाण्यांवर घेण्यात आलेला आक्षेप देशातल्या एकूण दारूसेवनाच्या व्याप्तीसमोर हास्यास्पद ठरतो.