- विवेक पंडित, pvivek2308@gmail.com
अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याने प्रथम वर्षातच अर्थशास्त्र विषयात नापास झालो. मग परीक्षा देऊन मी पुन्हा वर्षभराच्या अंतराने द्वितीय वर्षात गेलो. कॉलेजच्या निवडणुका घोषित झाल्या. सी. आर. म्हणजे वर्ग प्रतिनिधी आणि जनरल सेक्रेटरी निवडायचा होता. १४५ पैकी तब्बल शंभराहून अधिक मतं मला मिळाली होती, तेव्हा मला आनंदापेक्षाही धक्काच बसला होता. मतमोजणीचा निकाल घोषित झाल्यावर जल्लोषाचा एकच कल्ला कानावर पडत होता... माझ्या मनात विचार आला, निवडणुकीसाठीची सारी शिकस्त कामाला आली असावी...