संघर्षच सक्सेस पासवर्ड

भूमिपुत्राची भरारी
prakash patil
prakash patilsakal
Updated on

एमपीएससी,(MPSC) यूपीएससी (UPSC)किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत टिकून राहण्यासाठी आत्मविश्‍वास ढळू देऊ नका. सततचा संघर्ष (Struggle)यशाकडे घेऊन जातो. कोणत्याही परीक्षेला गुरूकिल्ली वगैरे काही नसतं. प्रामाणिकपणा, कष्ट आणि सातत्य ठेवल्यास यशाचं शिखर गाठता येतं, असं मत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केलं.

prakash patil
खाकी वर्दीवर रक्ताचा डाग; मद्यधुंद अवस्थेत डिलिव्हरी बॉयला उडवलं

कौटुंबिक पार्श्र्वभूमी ते प्रशासकीय सेेवेबाबत त्यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या दिलखुलास मुलाखतीत अनेक आठवणींना उजाळा दिला. पुस्तक आणि मित्र हे माझे विकपॉईंट आहेत, हेही सांगण्यास ते विसरले नाहीत. तसं माझं मूळ गाव तासगाव (जि.सांगली) तालुक्यातील कौलगे. वडील गोविंद पाटील हे शेतकी खात्यात होते. त्यांच्या नोकरीमुळे माझे शिक्षण गावाऐवजी साताऱ्यात झालं. आपण पदवीधर नाही याची खंत वडिलांना होती. मुलांना उत्तम शिक्षण द्यायचं, असं त्यांना वाटत असे. आम्हा भावंडांकडे वडील आणि आई मंदाकिनी पाटील यांनी विशेष लक्ष दिले. साताऱ्याच्या भोसले मिलिटरी स्कूलमध्येही होतो. पुढे एमपीएससीची परीक्षा दिली. पोलिस उपअधीक्षक (१९९८) म्हणून निवड झाली. जळगाव, कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड, भिवंडी, पुणे, सोलापूर येथेही होतो. आता नगरमध्ये पोलिस अधीक्षक आहे. वडील शिस्तीचे भोक्ते होते. तसेच मनाने कणखर होते. आईनेे शिक्षणाचं महत्त्व नेहमीच पटवून दिलं. बुद्धीने सरस असाल, तरच लोक तुमचा आदर करतील ही आईची शिकवण. तिच्या या शिदोरीवरच माझी वाटचाल सुरू आहे.

prakash patil
सहा वर्षांच्या मुलीवर कांदिवलीत अत्याचार; डिलिव्हरी बॉयला अटक

‘मृत्युंजय’प्रथम वाचली

पहिलं वाचलेलं पुस्तक कोणतं? वाचनाने काय दिलं? असे विचारता पाटील म्हणाले, ‘‘ मी आयुष्यात प्रथम शिवाजी सावंत यांची ‘मृत्यूंजय’ वाचली. ती मनाला इतकी भावली की काही विचारू नका. या पुस्तकानं मला वाचनाचं वेड लावलं. प्रत्येकानं नेहमीच शिकत राहिलं पाहिजेे. वाचनाने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. त्यामुळे तरूणाईने वाचलंच पाहिजे. वेळ मिळेल तसं वाचत असतो. तसेच व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, क्रिकेटही खेळायला आवडतं.

नवं शिकण्याची तयारी!

खरंतर मी पुण्यात येण्याअगोदर वाहतूक शाखेत कधीच काम केलं नव्हतं. पण, तेथे गेल्यानंतर सहकाऱ्यांकडून माहिती घेऊन अभ्यास केला आणि वाहतुकीला शिस्त लावली. मी स्वत: चौकातील सिग्नलवर थांबून वाहतूूक अनुभवली. नागरिकांना विश्र्वासात घेतले. कोणत्याही चांगल्या कामाला नागरिकांचा पाठिंबा असतो, असं मला वाटतं.

prakash patil
अखेर लसीकरण प्रमाणपत्रावरुन हटवला जाणार PM मोदींचा फोटो

तरुणांना संदेश !

शहर असो की ग्रामीण. तरुणांनी आवडीनुसार क्षेत्र निवडले पाहिजे. कोणतीही नोकरी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. नोकरी करताना आपल्याला देशासाठी, लोकांसाठी काम करायचंय याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. मात्र, प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे.

टपरीवरचा चहा

आयुष्यात कोणती गोष्ट करायची राहून गेली याकडे लक्ष वेधले असता तेे म्हणाले, पोलिस अधिकारी आहे. वेळेचे नियोजन करतो. मला गाडी चालवायला आवडते. स्वत:ची गाडी असतेे तेव्हा ९९ टक्के मीच ड्राईव्ह करतो. तसेच फिरायला जाणं. मित्रांबरोबर गप्पा मारणं, कधीतरी जुन्या मित्रांबरोबर टपरीवरच्या चहाचा आस्वादही घेत असतो. खरं सांगू का मित्रांचा सहवास खूप भावतो.

prakash patil
‘... तरच मुस्लिमाचे घर सुरक्षित राहील’

घरी पै-पाहुण्यांचा राबता!

प्रशासकीय सेवेत आल्यानंतर स्वत:त बदल करावा लागतो. आपण लोकसेवक असतो हे विसरून चालत नाही. कुटुंबाला खूप वेळ देेता येत नाही. पत्नी मीनल हिचं कौतुक करावसं वाटतं. कारण ती समजून घेते. घरी पै-पाहुण्यांचा राबता असतो. काय हवं, काय नको हे तीच पाहते. प्रत्येकाच्या सुखा-दु:खात सहभागी होऊन मदत कशी करता येईल. आधार कसा देता येईल! हे आम्ही पाहतो. एकत्रित कुटुंब पद्धती अधिक भावतेे. घर पाहुण्यांनी, मित्रांनी भरलेलं असावं असं नेहमीच वाटतं.

पुस्तक लिहायचंय!

कौटुंबिक परिस्थिती तशी बेताचीच होती. तरीही आई-वडिलांनी जे संस्कार केले. शिकवलं. मोठ केलं. प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यानंतर आजपर्यंतच्या अनेक आठवणी मनात घर करून राहिल्या आहेत. जग जसं अनुभवलं तसं लिहायचंय. पुस्तकरूपाने मला ते मांडायचंय, असेही मनोज पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.