- सत्यरंजन धर्माधिकारी, ranjandharmadhikari132@gmail.com
कायद्यांचे नाव बदलताना त्यांना ‘भारतीय’ संबोधून दंडसंहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि साक्ष अधिनियम स्वदेशी होणार नाहीत. त्या मागील भावना आणि मर्म व उद्दिष्ट यांनी भारतीयतेची हमी कशी देता येईल हा विचार करावा लागतो. तसेच न्यायाची प्रतीके बदलली म्हणून गुलामगिरी, मागासलेपण यातून सुटका होत नसते. परकीय जोखड बाजूला सारले जात नाही.