बांगलादेशातल्या राजकीय सत्ताक्रांतीनंतर समाजमाध्यमांमध्ये सत्य-असत्य आशयनिर्मितीला चेव आला. तिथल्या अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याच्या कहाण्या प्रसृत झाल्या. तथ्यांश किती, हे तपासेपर्यंत असा आशय हातोहात मोबाईल बदलत राहतो. आशयाला राजकीय रंग चढू लागतो. मूळ आशय बाजूला राहतो, राजकीय रंगपंचमीत सगळी समाजमाध्यमं रंगून निघतात.