डॉ. कैलास कमोद
पिया तोसे नैना लागे रे
नैना लागे रे
जाने क्या हो अब आगे रे
प्रियकराला उद्देशून इतक्या प्रेमभरानं ‘ती’ नर्तकी गात आहे. गाता गाता नृत्यदेखील करत आहे. गाण्यातून विरह झिरपत असला तरी तिच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र विरहाचे नाहीत, तर तिच्या चेहऱ्यावर हास्य झळकत आहे. हे गीत ती स्टेजवर प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी गात आहे. असं असलं तरीही गीतातलं काव्य हे तिच्या मनातल्या विरहाच्या भावनाच उलगडून दाखवत आहे.
जग ने उतारे, धरती पे तारे
पर मन मेरा मुरझाए
उन बिन आली, ऐसी दिवाली
मिलने को जिया उकलाए
आ सजन, पायल पुकारे
झनक झन झन झनक झन झन, पिया तोसे...