- सुदर्शन चव्हाण, chavan.sudarshan@gmail.com
‘द एलिफंट व्हिस्परर्स’ माहितीपटात हत्तींबद्दल फार माहिती सांगणं नाही की निवेदकाची लुडबुडही नाही. चौघांची कथा आपल्यासमोर घडत राहते आणि तो फक्त एक अनुभव म्हणूनच समोर येतो. कदाचित तोच जगभरात सर्वांना भावला आणि ‘छोट्या छोट्या’ हत्तींनी भारताला पहिल्यांदा ‘ऑस्कर’ मिळवून दिला.
दिग्दर्शिका कार्तिकी गोन्सलवेसने कित्येक वर्षे संयमाने आणि अत्यंत निगुतीने ‘द एलिफंट व्हिस्परर्स’चे चित्रीकरण केलं आहे. बोम्मन, बेल्ली, रघू आणि अम्मुकुट्टीकडे ती आपुलकीने बघते, असं प्रत्येक फ्रेम बघताना जाणवते.