मुक्ता चैतन्य
सतत मोबाईल बघणं आणि ऑनलाइन असण्याचे फक्त मानसिक किंवा भावनिक परिणाम होतात असं नाहीय. सतत एका जागेवर बसून मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर गोष्टी बघत राहण्याचे किंवा टीव्हीवर काहीतरी बघत बसण्याचे शारीरिक परिणामही गंभीर असू शकतात. आजच्या डिजिटल-युगात मुलांच्या हातात स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉप लवकरच येतो आणि तासन् तास या साधनांवर मुलं वेळ घालवतात. जेवताना मुलांच्या समोर स्क्रीन नसेल तर त्यांना जेवण जात नाही. मुळात स्क्रीन नसेल तर जेवायलाच आवडत नाही अशी अनेक घरांमधून परिस्थिती आहे. याचा शारीरिक स्वास्थ्यावरही प्रचंड परिणाम होत आहे, असं अनेक अभ्यासांतून आता पुढं आलेलं आहे.