- केतन पुरी, ketan.author@gmail.com
भारतात अति भव्य-दिव्य वास्तू जर कुणी निर्माण केल्या असतील, तर चोळ राजवंशाने. दूर दक्षिणेत, तमिळनाडूमध्ये साधारण हजारेक वर्षांपूर्वी आपल्या राज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या चोळ घराण्यानं फार भव्य मंदिरं बांधली. त्यातील काही तर आज जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाली आहेत. या चोळ घराण्यातील महान शासकाने भव्यतेचा पायंडा पाडला.