डायरी
अरविंद जगताप,jarvindas30@gmail.com
कुठल्याही सरकारच्या काळात त्याचं कौतुक करावं, असे प्रसंग फार कमी येतात. सरकार चालू शकतं. मग ते चालवणारं कोणीही असू दे... ती एक व्यवस्था बनलेली असते. पण त्यात आपलंही काम असतं, व्यक्त होण्याचं. फक्त मतपेटीतून नाही. कुठलाही धर्म माणसाला गोंधळ घालायला नाही, शांत व्हायला शिकवतो. प्रसन्न व्हायला शिकवतो. आतला आवाज ऐकायला भोंग्याची गरज नसते.