- विजयराज बोधनकर, vijayrajbodhankar1964, @gmail.com
प्रकाश बाळ जोशी यांच्या चित्रांचे एकल चित्र प्रदर्शन मुंबईच्या आर्टक्विस्टमध्ये शुक्रवारपासून सुरू झाले आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चित्रप्रवासाचा घेतलेला आढावा...
पृथ्वीला अनंताचा स्पर्श झाला आहे. जिकडे तिकडे सौंदर्याचा स्पर्श जाणवत राहतो. पृथ्वी कित्येक वर्षांपासून मौन राखून आहे. मौनात सृजनकलेचा एक सुंदर परीघ आहे आणि तो ज्याला ज्याला गवसत गेला तो तो श्रीमंत होत गेला. अस्वस्थ मनाला स्वस्थ करण्याची किमया कलेतून जन्माला येते. अनेक कलांमधली अशीच एक कला म्हणजे चित्रकला.