प्राची देवल
वयाचं ८७ वे वर्ष म्हणजे अनुभवानं, कार्यानं वाकलेलं-भारलेलं वय. त्यात सुद्धा त्याला जेव्हा प्रतिभेचं वलय प्राप्त होतं, तेव्हा त्या वयाला म्हातारपण येत नाही. हेच नेमकं बाळासाहेब म्हणजे हृदयनाथ मंगेशकर यांच्या बाबतीत घडलं असावं. खरंतर सर्वच मंगेशकरांच्या बाबतीत आपल्याला तेच म्हणावं लागेल. लता मंगेशकर ज्यांना गुरुस्थानी मानतात, ज्याचं सांगीतिक दडपण लतादीदींनाही येत असे तर सामान्य कलाकारांचा, माणसांचा काय पाडाव. अशा बाळासाहेबांचा काल ८७ वा वाढदिवस झाला. बाळासाहेब हे अतिशय मनस्वी असं व्यक्तिमत्त्व ! मनस्वी म्हणजे ज्याचं मन हे सखोल आहे आणि आत्मा अतिशय श्रीमंत व गुणवत्तेने परिपूर्ण आहे.