जगाच्या पाठीवर आठ हजार मीटरपेक्षा उंच १४ शिखरं आहेत, ही सर्वच शिखरं हिमालयात वसलेली आहेत. पाच पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये, सात नेपाळमध्ये तर दोन शिखरं ही पूर्णपणे तिबेटमध्ये आहेत, त्यातील एक म्हणजे माउंट च्योयु अन् दुसरं माउंट शिशापंग्मा. तिबेट हा जगासाठी अनवट आणि अगम्य प्रदेश. इथं राहणारी माणसं, इथलं आजचं जीवनमान हे फारसं जगासमोर येत नाही.