- अॅड. निखिल संजय रेखा, nikhil17adsule@gmail.com
नागापट्टणमच्या विस्तीर्ण पसरलेल्या वालुकामय समुद्रकिनाऱ्यावर मी शांत उभा होतो. त्यापूर्वी सलग आठ महिने रोज वीस तास काम करून मी पुरता थकलो होतो. तिथल्या थंडगार वाऱ्यानं माझं शीणलेलं मन शांत केलं. देवांची वाणी म्हणून पूज्य मानली गेलेली तमिळ भाषा नीट समजून घेण्यासाठी तमिळनाडूच्या कानाकोपऱ्यात हिंडत राहणे मला आजही आवडते. तमिळ आणि आपल्या मराठीचे सहजीवी नाते आहे.