- डॉ. सुनील दि. गोरंटीवार, saptrang@esakal.com
डिजिटल युग किंवा डिजिटल इंडिया हे शब्दप्रयोग आपणास नवीन नाही. २०२५ मध्ये एक जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया या मोहिमेची घोषणा केली. या मोहिमेचा मुख्य उद्देश भारताच्या प्रत्येक नागरिकास शासकीय सेवा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे. याद्वारे नागरिकास सेवा किंवा माहिती विविध उपकरणांद्वारे जसे मोबाइल, केव्हाही व कुठेही व प्रत्यक्ष जागेवर न जाता जलद गतीने तसेच कमी किमतीमध्ये उपलब्ध होते, सेवा वैयक्तिक स्तरावर उपलब्ध होते.