Diwali 2021 : दिवाळीतील पूजेचा अर्थ समजून घ्या!

दिवा हे उत्साहाचे, प्रसन्नतेचे प्रतीक आहे. म्हणूनच दीपावली हा प्रकाशाचा सण आणि चैतन्यपर्व असते, तर पूजेद्वारे सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त केली जात असते. त्यातून प्रेमभावही प्रतीत होत असतो.
diwali
diwaliesakal
Updated on
Summary

दिवा हे उत्साहाचे, प्रसन्नतेचे प्रतीक आहे. म्हणूनच दीपावली हा प्रकाशाचा सण आणि चैतन्यपर्व असते, तर पूजेद्वारे सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त केली जात असते. त्यातून प्रेमभावही प्रतीत होत असतो.

दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा सण आहे. प्रसन्नतेचा, समृद्धी आणि ज्ञान यांचा, बुद्धिमत्ता आणि कितीतरी गोष्टींचा हा सण आहे. केवळ एक दिवा तेवविणे पुरेसे नाही. अंधार घालवण्यासाठी आम्हाला ज्ञानाचे कितीतरी दिवे लावायचे आहेत. दिवा खरंतर एक प्रतीक आहे, तुमचे स्वतःचे प्रतीक. तुम्हाला उत्साहाने, प्रसन्नतेने आपल्या पूर्ण प्राणासह (जीवन शक्तीने) उजळायचे आहे आणि हाच तर खरा सण आहे. आणि हे फक्त पैसे, मित्र, सुविधा किंवा वस्तू यांमुळे होत नाही.

खरी प्रसन्नता ही ज्ञानामुळे येत असते.

आम्ही देवी लक्ष्मीची किंवा दिव्य मातृत्वाचे पूजन करतो. जे मागील वर्षात आशीर्वाद आणि संरक्षण दिल्याबद्दल धन्यवाद देण्याचे प्रतीक आहे. प्रार्थना करून आम्ही या दिव्यतेशी आपला संबंध नव्याने जागृत करतो. जो दिव्यतेच्या संपर्कात असतो त्याला कशाचीही कमतरता नसते. देवत्व सर्वत्र आहे, पण ते सुप्त आहे आणि पूजा (प्रार्थना) ही त्याला जागृत करण्याची पद्धत आहे. एक अतिशय प्राचीन प्रार्थना पुरोहितांद्वारे केली जाते, ऋग्वेदातील -श्री सूक्त जी मानवजातीच्या पहिल्या प्रार्थनांपैकी एक असल्याचे सांगितले जाते. त्याआधी सर्व अडथळे दूर करण्यासाठी श्रीगणपतीचे आवाहन केले जाते. नंतर कलशपूजा केली जाते. या कलशात (जलपात्रात) सर्व दिव्य शक्तींना आमंत्रित केले जाते आणि या ग्रहावरील प्रत्येकासाठी आशीर्वादाची प्रार्थना केली जाते, जेणेकरून त्यांना चांगले मन, हृदय, चांगली बुद्धी आणि बुद्धिमत्ता प्रदान केली जाते. जी तुमच्या हृदयाच्या परिपूर्णतेतून जन्माला येते, ती पूजा आहे.

सन्मान आणि कृतज्ञता

सन्मान करणे हे दैवी प्रेमाचे लक्षण आहे आणि पूजा ही परमात्म्याचा सन्मान करण्याची कला आहे. निसर्ग आपल्यासाठी आधीपासूनच जे करत आहे, पूजेचा सोहळा हे त्याचे अनुकरण आहे. परमात्मा तुमचे अनेक रुपांत पूजन करतो. पूजेमध्ये तुम्ही सर्व काही देवाला परत अर्पण करत असतात. पूजेमध्ये फुले अर्पण केली जातात. फूल हे प्रेमाचे प्रतीक आहे. आई, वडील, पत्नी, पती, मुले, मित्र अशा अनेक रुपांतून दिव्यतेने तुम्हाला प्रेम दिले आहे. तेच प्रेम सद्गुरूंच्या रुपाने तुम्हाला दैवी प्रेमाच्या पातळीवर उन्नत करण्यासाठी तुमच्याकडे येते. हाच तुमचा स्वतःचा स्वभावही आहे.

आयुष्यात सर्व बाजूंनी फुलणारे प्रेम ओळखून आम्ही फुले अर्पण करतो. फळे अर्पण केली जातात. कारण दिव्यता तुम्हाला योग्य वेळी फळ देते. तुम्ही धान्य अर्पण करता, कारण निसर्ग तुम्हाला अन्न पुरवतो. दिवा आणि थंड कापूराचा प्रकाश दिला जातो; जसे निसर्गातील सूर्य आणि चंद्र तुमचे पोषण करतात, तुमच्याभोवती प्रदक्षिणा घालतात. सुगंधासाठी उदबत्ती अर्पण केली जाते. पूजेमध्ये सर्व, पाचही इंद्रियांचा वापर केला जातो आणि ते सखोल भावनेने केले जाते. पूजेद्वारे आपण देवाला म्हणतो, ‘‘तू जे काही मला दिलेस ते मी तुला परत देतो.’’ पूजा म्हणजे सन्मान आणि कृतज्ञता. यज्ञविधीचे अनेक फायदे आहेत. यश (चांगले नाव), प्रज्ञा (उच्च चेतना), विद्या (शिक्षण), बुद्धी, बल (शक्ति) वीर्य (शौर्य), आयुष्य (दीर्घ जीवन) ऐश्वर्य (समृद्धी) आणि बरेच काही मिळवण्यासाठी याचे महत्त्व आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()