प्रज्ञेच्या प्रचीतीची कोजागरी !
गुरू आणि शनी हे ग्रह व्यक्तीच्या प्रारब्धाच्या चौकटीशी संबंधित आहेत. माणूस आणि माणसाच्या मर्यादा याचे मापन स्वतः माणसानेच करावं लागतं. यालाच आत्मनिरीक्षण म्हणतात आणि या आत्मनिरीक्षणातूनच माणसाचा विवेक जागृत होत असतो. गुरू आणि शनी हे ग्रह माणसाच्या विवेकबुद्धीशी संबंधित आहेत. माणूस विवेकभ्रष्ट झाला, की तो नसत्या उपाधीत सापडत असतो आणि हीच उपाधी नियती होते! आपल्या सूर्यमालेतील ग्रहांना त्यांच्या विशिष्ट मर्यादेतच सूर्याभोवती फिरावं लागतं. निसर्ग हा निसर्गतःच एक बॅलन्स सांभाळत असतो किंवा मर्यादा सांभाळत असतो. माणूस नैसर्गिक किंवा निसर्गतः वागला, की तो जास्त उत्तम यशस्वी होत असतो आणि मग त्याचं जीवन म्हणजे एक गाणं होत असते. यालाच स्वर म्हणतात!
कलियुगात माणूस बहुतांश अनैसर्गिकच वागत असतो. प्रज्ञावंत माणूस निसर्गाचा कल किंवा कौशल्य पाळत असतो ! विवेकाधिष्ठित प्रज्ञा निसर्गाच्या नैसर्गिक भावनेत वाटचाल करत असते. असा हा नैसर्गिक भक्तिभाव जपणारी प्रज्ञा प्रचितीच्या प्रांगणात कोजागरी पौर्णिमा साजरी करत असते. मित्रहो, गुरू हे ज्ञान आहे आणि शनी हे कर्म आहे. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान, कर्ता, कर्म आणि कार्य यांचे उत्तम व्यवस्थापन करणारा माणूसच माणूस या पदवीला प्राप्त होतो. असा हा माणूस ज्या वेळी भगवंत होतो, त्या वेळी तो गुरू होत असतो. यंदाच्या कोजागरी पौर्णिमेजवळ शनीच्या पाठोपाठ शनीच्या कर्मकारक मकर राशीत गुरू मार्गी होत आहे. आपल्या पाठीशी भगवंत आहे या जाणिवेत जगणं म्हणजेच निसर्गतः वागणं होय! आपल्या जीवनाचा किंवा आपल्या कर्माचा आरंभ आणि शेवट निसर्गच करत असतो. अशी ही प्रज्ञा ज्या वेळी जागृत होते त्या वेळीच माणूस खरी कोजागरी पौर्णिमेची रात्र जागवतो आणि अमृतरसपान करतो.
बेकायदेशीर व्यवहार टाळा
मेष : कोणताही शॉर्टकट सप्ताहात वर्ज्य आहे. गुरू आणि शनी या ग्रहांची सप्ताहातील स्थिती फक्त काही विशिष्ट विरोधातून सावरून नेईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी दादागिरी टाळावी. कोजागरी पौर्णिमेचं फिल्ड संमिश्र स्वरूपाचे. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींची धनचिंता जाईल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावेत.
व्यवसायात विक्रमी प्राप्ती होईल
वृषभ : सप्ताहातील गुरू आणि शनी या ग्रहांची स्थिती आणि मार्गी होणारा बुध ता. १९ व २० या पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात तरुणांना खास अशी फळे देईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं फिल्ड शुभ ग्रहांचेच. घरी व दारी मोठे कौतुक समारंभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींचे कलाकारांचे भाग्योदय. व्यावसायिक विक्रमी प्राप्ती. वास्तूविषयक व्यवहार.
नोकरीच्या मुलाखतीत यश
मिथुन : मंगळभ्रमण जरा अपवादात्मक राहील. नोकरीत हितशत्रूंचे भान ठेवा. बाकी नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. ता. १९ ऑक्टोबरचा शुक्रवार आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी छानच. नोकरीविषयक मुलाखतीत यश. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामांतून यश. स्त्रीच्या मध्यस्थीतून कामे. व्यावसायिक वसुली.
थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल
कर्क : सप्ताहात आपलं मार्केटिंग यशस्वी होईल. अर्थातच व्यावसायिक बुद्धिचातुर्य उपयोगी पडेल. सप्ताहात गुरू आणि शनी यांच्या विशिष्ट पॅकेजमधून थोरामोठ्यांचे सहकार्य. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींवर असलेली राजकीय दहशत संपेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ विवाहयोग. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ दुखापती सांभाळाव्यात.
व्यावसायिक वसुली होईल
सिंह : सप्ताह वादग्रस्त आर्थिक व्यवहारांतून मार्ग काढणारा. ता. १९ ऑक्टोबरचा शुक्रवार शुभ ग्रहांचा, विशिष्ट पुत्रचिंता जाईल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक वसुली होईल. मित्रांकडून लाभ. पौर्णिमा घरातील प्रिय व्यक्तींच्या समारोहाची. घरात कार्ये ठरतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासात सांभाळावे. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकींतून लाभ.
नोकरीतील अडचणी संपतील
कन्या : सप्ताह पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात उत्तम बोलेल. नोकरीतील अडचणीची परिस्थिती निघून जाईल. काहींचे पतप्रतिष्ठाविषयक प्रश्न सुटतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा इम्युनिटी डोस मिळेल, अर्थातच नोकरी-व्यावसायिक क्षेत्रांमध्ये. अडलेलं विवाहप्रकरण मार्गी लागेल. प्रेमविवाहाला मान्यता मिळेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी भाजण्यापासून जपणे.
कलाकारांचा भाग्योदयाचा कालखंड
तूळ : गुरू आणि शनी या ग्रहांची विशिष्ट स्थिती आणि मंगळभ्रमण संमिश्र स्वरूपात बोलू शकते. कोणाशी सत्तेची किंवा पैशाची दादागिरी नको. बाकी पौर्णिमेचे फिल्ड स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी वैयक्तिक सुवार्ताचेच. कलाकारांचे मोठे भाग्योदय. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी वाहनं जपावीत. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी श्वानदंशापासून जपावे.
नोकरीत रुबाब वाढेल
वृश्चिक : पौर्णिमेचं एक सुंदर स्पंदन राहील. व्यावसायिक मार्केटिंग यशस्वी होईल. नोकरीतील रुबाब वाढेल. मात्र अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींनी गर्दीची ठिकाणं टाळावीत. घरातील व्रात्य लहान मुलं जपावीत. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय लाभ. तरुणांचे स्पर्धात्मक यश. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार प्रवासात चोरीचा.
व्यावसायिक ओढाताण संपेल
धनु : सप्ताहात गुरू आणि शनी या ग्रहांची वैशिष्ट्यपूर्ण स्थिती राहील. व्यावसायिक ओढाताण संपेल. एखादे राजकीय कनेक्शन कामाला येईल ! पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना एखादे फोटोफिनिश यश देईल. विशिष्ट भूखंड सोडवाल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची मातृपितृचिंता जाईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार अकारण कलहाचा.
राजकीय वर्चस्व वाढेल
मकर : पौर्णिमेची शुभस्पंदनं खेचून घ्याल. राजकीय किंवा सामाजिक वर्चस्व वाढेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना कोजागरी पौर्णिमेचं भरतं मोठ्या कनेक्टिव्हिटीचे. उत्सव-प्रदर्शनातून लाभ. गुरू आणि शनी यांची विशिष्ट स्थिती मोठी तारक राहील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींसाठी बलवत्तर विवाहयोग. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी चोरी-नुकसानीपासून जपावं.
टोकाचे वाद टाळा
कुंभ : सप्ताह पौर्णिमेजवळ हाय व्होल्टेजचा राहील. कोणतीही मस्ती नको. खरेदी-विक्रीत जपा. बाकी अष्टमस्थ मंगळभ्रमणाची स्थिती. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना संमिश्र स्वरूपाची फळे देणारी. कोणतेही टोकाचे वाद टाळा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा सुवार्तातून सेलिब्रेटी बनवेल. कलाकारांचे भाग्योदय.
खरेदी विक्रीचे मोठे व्यवहार होतील
मीन : पौर्णिमेचा एक मोठा ऊर्जास्रोत राहील. या ऊर्जेचा रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना प्रचंड लाभ होईल. तरुणांना नोकरीत मोठे शुभसंकेत मिळतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचे मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार. आई-वडिलांचे भाग्योदय होतील. परदेशी व्हिसाचे काम होईल. शनिवारी धारदार वस्तू जपा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.