- केदार गोरे, gore.kedar@gmail.com
जंगल आणि पाणी यांचे एकमेकांशी जोडलेले अतूट नाते असते. भीमा, गोदावरी, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी, काबिनी, कोयना, काळी, वैतरणा, घटप्रभा, मांडवी या मुख्य नद्या आणि अनेक उपनद्या पश्चिम घाटांतील वनाच्छादित डोंगराळ भागांमध्ये उगम पावतात. भारतातील असंख्य लोकांसाठी मोलाची जीवनरेखा बनून वाहतात. आपली संस्कृती नैसर्गिक संसाधनांचा आदर आणि पूजा करणारी आहे. मात्र, मानवाच्या बदललेल्या जीवनशैलीचा फटका यांतील अनेक पवित्र स्थानांनाही बसला आहे व त्या परिसरातील वनांवर त्याचा विपरीत परिणाम आता दिसू लागला आहे.