हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड चले
जीवन की हम सारी रस्में तोड चले
तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात गुंतू लागले की त्यांच्या चोरून-लपून भेटी-गाठी होत राहतात. प्रेमाच्या आणा-भाका होतात. विवाहबंधनात अडकण्याचं ते दोघं ठरवतात. त्यानंतर खरी समस्या उभी राहते. आता हे प्रेमप्रकरण घरी सांगायचं कसं? सगळेच पालक काही सहजासहजी हे स्वीकारतील असं नसतं. तरुण-तरुणींचा आर्थिक स्तर, जात-धर्म, सामाजिक स्तर असे काहीतरी मुद्दे उपस्थित करून काही पालक त्या दोघांचं प्रेम नाकारून विवाहाला मान्यता देत नाहीत. आता काय करायचं हा दोघांपुढचा प्रश्न.