कोयना व मोरणा विभागात अनेक ठिकाणी झालेले भूसल्खनामुळे डोंगर धोकादायक बनला आहे.
कोयनानगर (सातारा): पाटण तालुक्यात जुलै महिन्यात २२ तारखेला ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पाऊसाने पाटण तालुक्यात अपरिमित हानी झाली आहे. तालुक्यात झालेली जीवितहानी व वित्तहानी जीव पीळटाऊन टाकणारी आहे. कोयना व मोरणा विभागात अनेक ठिकाणी झालेले भूसल्खनामुळे डोंगर धोकादायक बनला आहे.
कोयना विभागातील ५ तर मोरणा विभागातील ५ गावांना निर्माण झालेला धोका कायमच आहे. या पुढच्या काळात या ठिकाणी भूसल्खनन होण्याची शक्यता असल्याने या परिसराची पाहणी करून हा परिसर ग्रामस्थांना राहण्यासाठी योग्य आहे की नाही याचा अभ्यास करून लवकरच त्या बाबतचा अहवाल जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना लवकर सादर करणार असल्याची माहिती भूगर्भ तज्ञांनी दिली.
२२ जुलै रोजी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी भूसल्खनन होवून आपत्तीचा डोंगर कोसळला आहे. पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील आंबेघर कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या ठिकाणी भूसल्खनन होवून प्रचंड जीवित व वित्त हानी झाली आहे. भूसल्खनामुळे धोकादायक बनलेल्या डोंगरांची पाहणी भूगर्भ तज्ञांनी प्रत्यक्ष केली आहे. कोयना विभागातील हुंबरळी, मिरगाव, ढोकावळे येथे या दोन सदस्य असलेल्या पथकांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत तहसीलदार योगेश्वर टोम्पे, तलाठी रमेश टिपूगडे, पोलीस पाटील महेंद्र देसाई आदी उपस्थित होते.
कोयना विभाग हा भुकंपप्रवणक्षेत्र आहे. या परिसरात वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या छोट्या मोठया धक्क्याने सह्य़ाद्री च्या डोंगररांगा कमकुवत झाल्या त्यातच ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे भूसल्खनन होऊन अनेक गावे भुईसपाट झाली आहेत का ? असा प्रश्न भूगर्भ तज्ञांना विचारला आसताना त्यांनी ही शक्यता असू शकते, त्यासाठी सेस्मॉलॉजिकल सर्व्हे गरजेचे आहे. आमचा जिऑलॉजिकल सर्व्हे असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.