कऱ्हाड : स्क्रीनिंग मशीनमध्ये सापडून ठार झालेला युवक, घंटागाडी खाली जीव गमावलेला चिमुरडा, इदगाह मैदानात खड्ड्यात पडून जीव गमावलेले दोन चिमुरडे, डेंगीच्या आजाराने दोन लहान मुलींची गेलेला जीव आणि ड्रेनजच्या खड्ड्यात पडून ठार झालेले ज्येष्ठ नागरीक अशी किततरी घटना सांगता येतील. ज्यांचा केवळ पालिकेच्या हालगर्जीपणाने मृत्यू झाला. दोन वर्षात एक दोन नव्हे तर तब्बल ११ जणांना जीव गमवावा लागला आहे. तरिही पालिका कामे करताना अपेक्षीत काळजी घेतानाव दिसत नाही. काळजी न घेणाऱ्या ठेकेदारांवरही कारवाई करत नाही. त्यामुले किती लोकांचा जीव गमावल्यावर पालिकेला जाग येणार, हाच खरा प्रश्न आहे.
येथील कचरा डेपोवर पालिकेने बसवलेल्या स्क्रीनिंग यंत्रणेत सापडून दिड वर्षापूर्वी युवक ठार झाला. तो युवक बाहेरील असल्याने त्याचा गाजावाजा झाला नाही. मात्र, त्यानंतर आजअखेर ११ जणांना पालिकेच्या हालगर्जीपणामुळे जीव गमावाव लागला आहे. अलीकडच्या काळात दोन लहानग्यांचा इदगाह मैदानात वृक्षारोपनास काढलेल्या खड्ड्यात पडून जीव गेला. ज्येष्ठ नागरीकाचाही ड्रनेच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. गॅस लिकेज झाल्याने एकाचा गुदमरून मृत्यू झाला. बुधवार पेठेतील विराट चव्हाण याचाही हालगर्जीपणाने काल रात्री जीव गेला. प्रत्येकवेळी पालिकेने हातवर करणार पालिकेने काहीही जबाबदारी घेणार नसले तर थातूर मातूर उत्तरे दिली. पालिकेत कामाच्या नावाखाली होणारा संधीसाधूपणाही वाढल्याने नागरीकांना जीव गमावण्याची वेळ आली आहे.
पालिकेतील अधिकारीही हालगर्जीपण करताहेत. अधिकारी, नगरसेवकांत कोणत्याही एकमत नाही. कोणत्याही प्रसंगाला ते सिरियसली घेत नाहीत. परिणामी कामे पेंडिंग तर राहतातच, त्याशिवाय ती निकृष्ट व दर्जाहीन होत असल्याच्या तक्रारी आहेत. तरिही दुर्लक्ष होते. तोच बेजबाबदार व विस्कळितपणा नागरिकांच्या जिवावर बेततो आहे. तरीही नगरसेवकांना जाग येताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांच्या भावना संतप्त आहेत. पालिकेच्या कारभाऱ्यांचे अवघे २० दिवस राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्यात एकमत नाही. वास्तविक बुधवार पेठेत काम सुरू झाले त्याला विरोध असतानाही ते काम कोणाच्या परवानगीने सुरू झाले. त्याला सुरक्षा व्यवस्था काहीच केली नव्हती, ती करण्याची मागणी नागरीकांची होती तरिही त्याला विरोध झाला अशा अनेक गोष्टी आता पुढे येत आहेत. पालिका लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या समन्वयाचा अभावाचाच तो पारिपाक आहे. पालिकेत राजकीय वातावरण गढूळ होत असल्याने कारभारात प्रचंड विस्कळितपणा आल्याने स्पर्धा वाढली आहे. त्याचा परिणाम विपरीत नागीरकांचा जीव गमावण्यापर्यंत जोवू लागला आहे. आहे
सर्वसमावेशकता कमी अन् सुंदोपसुंदीच जास्त
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे थेट जनतेतून आल्या आहेत. मात्र, पालिकेत भाजपचे बहुमत नाही. बहुमतील यशवंत जनशक्ती विकास आघाडीमध्ये एकमत नाही. उपाध्यक्ष जयवंत पाटील त्या आघाडी असूनही दिसत नाही. आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांनाही कसरत कारवी लागते आहे. विरोधी आघाडी म्हणून लोकशाही आघाडी आहे. गटनेते सौरभ पाटील काही मुद्दांवर बोलले तरी बहुमताअभावी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये सर्वसमावेशकपणा कमी आणि राजकीय सुंदोपदुींच जास्त दिसेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.