Solar Company : सोलर कंपनीने शिखर शिंगणापुरात हजारो झाडांवर फिरवला जेसीबी; पर्यावरणप्रेमींतून संतापाची लाट

वृक्षतोड करणाऱ्या सोलर कंपनीवर तातडीने गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे यांनी दिला आहे.
Trees in Shikhar Shingnapur
Trees in Shikhar Shingnapuresakal
Updated on
Summary

सौरऊर्जा प्रकल्पासाठी दिलेल्या जागेतील हजारो झाडांची कत्तल केल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी झाली आहे.

शिखर शिंगणापूर : येथील (Shikhar Shingnapur) गायरान गट क्रमांक ४२० मधील दहा हेक्टर क्षेत्रात सामाजिक वनीकरण विभागाने (Social Forestry Department) लाखो रुपये खर्च करून ११ हजार १११ हजार झाडे लावली होती. मात्र, सोलर कंपनीने (Solar Company) सौरऊर्जा प्रकल्पासाठी हजारो झाडांवर जेसीबी फिरवून सारे भुईसपाट केले आहे. या प्रकारामुळे शिंगणापूर ग्रामस्थांसह पर्यावरणप्रेमींमध्‍ये संतापाची लाट उसळली आहे.

Trees in Shikhar Shingnapur
'..तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना कृष्णा-पंचगंगेच्या पाण्याने अंघोळ घालणार'; माजी खासदाराने दिला थेट इशारा

वृक्षतोड करणाऱ्या सोलर कंपनीवर तातडीने गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे यांनी दिला आहे. माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेल्या गायरान जागेत महावितरण कंपनीमार्फत मुख्‍यमंत्री सौरऊर्जा प्रकल्‍प (CM Solar Energy Project) हाती घेण्यात आले आहेत. याठिकाणी एका सोलर कंपनीमार्फत संबंधित जागा सपाटीकरण करून चाचणी घेण्याचे काम सध्‍या सुरू आहे.

परंतु, सौरऊर्जा प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या जागेतील जवळपास दहा हेक्टर क्षेत्रात तीन वर्षांपूर्वीच्‍या ११ हजार वृक्षांची (Trees) लागवड केली होती. सामाजिक वनीकरण विभाग तसेच शिंगणापूर ग्रामपंचायतीने टँकरने पाणी घालून या झाडांचे संगोपन केले होते, तसेच याच परिसरात सावली देणारी मोठी झाडेही होती. मात्र, महावितरणअंतर्गत सुरू असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी संबंधित सोलर कंपनीने सामाजिक वनीकरण विभाग तसेच शिंगणापूर ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना न देता याठिकाणी लागवड केलेल्या हजारो झाडांवर जेसीबी चालवून कत्तल केली आहे, तर काही मोठी झाडेही मुळासहित उखडून काढली आहेत.

Trees in Shikhar Shingnapur
Adani Power Plant : तब्बल 'इतक्या' गावांचा विरोध डावलून अदानी प्रोजेक्टचं काम सुरू; नागरिकांतून तीव्र संताप

या प्रकारामुळे वृक्ष लागवड प्रकल्पाचे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. सोलर कंपनीने हजारो झाडांची कत्तल केल्याने शिंगणापूर ग्रामस्थ तसेच पर्यावरणप्रेमी संतप्त झाले असून, याप्रकरणी दोषी असलेल्या महावितरण अधिकारी, सोलर कंपनी, संबंधित ठेकेदार यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा ता. ११ मे रोजी माण तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबतचे निवेदन मुख्यमंत्री, सामाजिक वनीकरणमंत्री, सातारा जिल्हाधिकारी, माण प्रांताधिकारी, तहसीलदार, सामाजिक वनीकरण कार्यालय, दहिवडी पोलिस ठाणे यांना देण्यात आले आहे, तसेच पर्यावरणाची हानी करून वृक्षतोड करणाऱ्या संबंधितांवर कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा गोंदवले येथील रोहित रक्षिता फाउंडेशनच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Trees in Shikhar Shingnapur
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; पर्यटक, चाकरमानी परतीच्या मार्गावर, वाहनांची गर्दी वाढली

ग्रामपंचायत दाखल करणार गुन्‍हे

सौरऊर्जा प्रकल्पासाठी दिलेल्या जागेतील हजारो झाडांची कत्तल केल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी झाली आहे. झाडे तोडण्यापूर्वी महावितरण, सोलर कंपनी तसेच संबंधित ठेकेदाराने ग्रामपंचायत कार्यालयाशी कोणताही संपर्क केला नाही. सौरऊर्जा प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून तसेच कायदेशीर बाबी माहिती घेऊन हजारो झाडांची कत्तल करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती शिंगणापूर सरपंच सारिका शेंडे व उपसरपंच राजू पिसे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.