Crop Insurance : सातारा जिल्ह्याला ११५ कोटींची पीक विमा भरपाई; दोन लाख २७ हजार शेतकऱ्यांना लाभ

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्याच्या इतिहासात सर्वाधिक नुकसान भरपाई विमा रक्कम यावर्षी मिळाली आहे.
Crop Insurance
Crop Insurance esakal
Updated on

सातारा - प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्याच्या इतिहासात सर्वाधिक नुकसान भरपाई विमा रक्कम यावर्षी मिळाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील दोन लाख २७ हजार शेतकऱ्यांना तब्बल ११५ कोटी रुपये भरपाई मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांत प्रथम इतक्या मोठ्या प्रमाणात पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नव्‍हती. विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पिकांची उगवण चांगली न होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते, तसेच सरकारनेही पावसाचे अल्प प्रमाण लक्षात घेऊन जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर केली होती. शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होऊन एक रुपयात विमा मिळविण्याचे आवाहन शासन व कृषी विभागाने केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने एक रुपयात पीक विमा योजनेसाठी अर्ज केला होता. तब्बल दोन लाख ७६ हजार शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला होता.

खरीप हंगामात अल्प पावसामुळे काही ठिकाणी पिकांची उगवण झाली नाही, तर काही ठिकाणी पिकांना अपेक्षित उत्पन्नच मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई

होण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील दोन लाख ७६ हजार शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरली होती. त्या पैकी दोन लाख २७ हजार शेतकऱ्यांना आता भरपाईची रक्कम खात्यावर जमा होत आहे. जिल्ह्याला या भरपाई रकमेतून तब्बल ११५ कोटी रुपये मिळाले आहेत.

पीक विमा भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्‍त असून, शेतीचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळावे, यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा घ्यावा. त्यासाठी १५ जुलैपर्यंत एक रुपयात पीक विमा हप्ता भरावा.

- भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.