UNESCO : शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या 'प्रतापगड'ची वारसा स्थळासाठी शिफारस; 'या' 12 किल्ल्यांचाही समावेश

प्रतापगड हा किल्ला शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देत दिमाखात उभा आहे.
UNESCO World Heritage List Pratapgad
UNESCO World Heritage List Pratapgadesakal
Updated on
Summary

प्रतापगड हा किल्ला शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध करण्यात आला होता.

महाबळेश्‍वर : युनोस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रतापगड (Pratapgad), पन्हाळगड, रायगड, शिवनेरीसह एकूण बारा किल्ल्यांचे २०२४-२५ साठी भारताने ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’च्या माध्यमातून नामांकन केले आहे. या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश होण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक खात्याच्या वतीने युनेस्कोला (UNESCO) शिफारस करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडसह प्रतापगड, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, राजगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा या नामांकनामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

UNESCO World Heritage List Pratapgad
Maratha Reservation : अधिसूचनेत कुणबींच्या सग्यासोयऱ्यांनाही दाखले; बावनकुळे म्हणाले, तो अंतिम मसुदा नाही..

हे किल्ले मराठा राजवटीमधील सामरिक शक्तींचे दर्शन घडवणारे आहेत. हे किल्ले मराठा शासकांच्या असाधारण पराक्रमाने नावारूपाला आलेले आहेत. यातील अनेक किल्ल्यांची बांधणी शिवकालात, तसेच त्यानंतर झाल्याचे दिसून येते. प्रतापगड हा किल्ला शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध करण्यात आला होता.

UNESCO World Heritage List Pratapgad
ऐतिहासिक वारसा लाभलेलं 'धर्मगिरी तीर्थक्षेत्र'; जैन धर्मियांची आहे पावन भूमी, या ठिकाणी कसे पोहोचाल?

कोल्हापूरपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर असलेला पन्हाळागडाचीही शिफारस केली जाणार आहे. इतिहासामध्ये पन्हाळगडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच किल्ल्याला सिद्धी जोहरने वेढा दिला होता. या वेढ्यातून शिवछत्रपती विशाळगडाच्या दिशेने शिताफीने निसटून गेले होते. पन्हाळगडावर सज्जा कोठी, तीन दरवाजा, अंधारबाव, धर्मकोटी, अंबरखाना, पुसाटी बुरूज दिमाखात उभा आहे.

UNESCO World Heritage List Pratapgad
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींना 'या' राज्यातून दिली जाणार राज्यसभेसाठी उमेदवारी?

महाराष्ट्रातील किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा, ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर वारसा स्थळाची अंतिम मोहोरही उमटेल. या किल्ल्यांना आता जागतिक ओळख मिळेल.

-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.