Teen Patti Clubs in Karad
Teen Patti Clubs in Karadesakal

Karad Gambling News : कऱ्हाडात पत्त्यांचा 'डाव' जोमात; शहर-उपनगरात 13 क्लब, पोलिसांकडून कारवाई नाहीच!

पत्त्याच्या क्लब मालकाच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक तक्रार करताना दिसत नाहीत.
Published on
Summary

तत्कालीन पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या काळात पोलिसांनी पत्त्यांचे क्लब टार्गेट करून कारवाई केली होती.

कऱ्हाड : शहर व तालुक्यातील मोजक्या भागात सुरू असलेल्या पत्त्यांच्या क्लबला पोलिसांचेच (Karad Police) पाठबळ मिळत आहे. शहर व त्याच्या उपनगरात जवळपास १३ पत्त्यांचे (Teen Patti) क्लब सुरू आहेत. त्यात लाखो रुपयांची उलाढाली होत आहेत. पोलिसांनी कारवाई करू नये, यासाठी त्यांचा अलिखित हिस्सा असल्याची चर्चा शहर परिसरात आहे.

नागरी वस्तीतील एखादे घर भाड्याने घेऊन सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लब मालकाच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक तक्रार करताना दिसत नाहीत आणि तरीही त्याची तक्रार झाली, तरी पोलिसांकडून कारवाई होताना दिसत आहेत. अंधाऱ्या खोलीत तीन पानी जुगाराचे अड्डे फुलत आहेत. त्याला पोलिसांचे अभय अन् राजकीय वरदहस्तही लाभत आहेत. नव्याने आलेल्या पोलिस निरीक्षक कोंडिराम पाटील व जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख त्या पत्त्यांच्या क्लबवर (Gambling) कारवाई करणार का? हा खरा प्रश्न आहे.

Teen Patti Clubs in Karad
Gokul Dudh Sangh : दुधाचा 'गोकुळ-शक्ती' नवा ब्रँड मुंबई गाजवणार; मंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास

खेळणाऱ्याला मागेल ते देण्याची व्यवस्था

श्रीमंत लोक खेळायला येतात. गरीब लोक तेथे कामाला असतात, असा क्लबचा प्रचार करत मालक लोक त्यांचा काळा बाजार जोरात चालवत आहेत. पत्त्यांच्या क्लबमध्ये जो कोणी खेळायला येईल, त्याची सर्व सोय केली जाते. मागेल ते खायला अन् प्यायला दिले जाते. रात्रंदिवस चालणाऱ्या जुगारात अनेकजण मात्र कंगाल होत आहेत.

वजनाप्रमाणे हप्ता

पोलिस व जुगार चालवणाऱ्यांचे लागेबांधे आहेत. ते काही नवीन नाही. मात्र, पोलिस ठाण्यातील वजनदार साहेब व हवालदाराचा हप्ता हा त्याच्या पोलिस खात्यातील वजनावर ठरतो आहे. पत्त्यांचा क्लब चालवणाऱ्या मालकाच्या हातात या साऱ्यांची जणू कुंडलीच असते. त्यामुळे प्रत्येकाला त्याला त्याच्या वजनाप्रमाणे ठरलेली रक्कम केली जाते. त्यासाठी ठराविक तारीखही ओलांडून दिली जात नाही.

पूर्वी हद्दपारीचे प्रस्ताव

तत्कालीन पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या काळात पोलिसांनी पत्त्यांचे क्लब टार्गेट करून कारवाई केली होती. त्यावेळी १५ पेक्षा जास्त तीन पानी जुगार अड्डे उद्‌ध्वस्त केले होते. त्यात सुमारे ३३ जणांना अटक झाली होती. त्या अड्डे चालवणाऱ्यांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव त्या वेळी दिले होते.

Teen Patti Clubs in Karad
Terrorist Organization : 'इसिस'च्या दहशतवाद्याला दहा वर्षांचा तुरुंगवास; एनआयए न्यायालयाचा मोठा निर्णय
  • मलकापूर - गोकाक पाणीपुरवठा संस्थेच्या शेजारील एका खोलीत. त्याचा मालक अण्णा नावाने प्रचलित

  • मलकापूर - मोठ्या मॉलच्या जवळच्‍या एका फ्लॅटमध्ये भरतो. मालकाचा पोलिस मॅनेज केल्याचा आव

  • वारूंजी फाटा - प्रसिद्ध वडापाव विक्रीच्या जवळील एका खोलीत. मर्दानी तीन पत्त्यांचा डाव - मालक फेमस

  • कऱ्हाडच्या बर्गे वस्ती, छत्रपती शिवाजी स्टेडीयमच्या मागील परिसरात रंगतोय डाव- मालक परिसरात फेमस

  • जखिणवाडी येथे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या एका खोलीत

  • कोपर्डे हवेलीच्या ओढ्यानजीकही भरतोय डाव- मालकाची राजकीय मंडळीत ऊठबस

  • कार्वे - गावालगतच्या एका जागेत डाव - शेठजी नावाचा मालक फारच चलाख

  • शेणोली स्टेशन - खोली भाड्याने घेऊन भरतोय डाव - मालक सगळं करतो मॅनेज

  • बारा डबरी परिसर - एका राईस मिललगतच्या परिसरात भाड्याच्या खोलीत भरतो डाव - मोठी उलाढाल

  • गोटे - पोलिसांच्‍या नोंदीतील संशयिताचा येथे डाव - गाव सारं शांत

  • ओगलेवाडी - ग्रामीण भागातील काहींना सोबत घेऊन क्लब सुरू - सामाजिक कार्याचा मालकाचा दिखावा

  • रुक्मिणीनगर - काटकर वस्तीत भरतोय डाव - मंगळवार पेठेतील राजकीय व्यक्तींशी संबंधित त्याचा मालक

  • सोमवार पेठ - एका फ्लॅटमध्ये भरतोय डाव - सोमवारात त्याचे कोणालाच नाही सोयर सुतक

Teen Patti Clubs in Karad
'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आसनाची त्यांनी किंमत केली, हे दुर्दैवी'; आमदार साळवींची हताश प्रतिक्रिया

आतापर्यंतच्‍या कारवाया

छापा संशयितांना अटक मुद्देमाल जप्त (रुपये)

पोस्टल कॉलनी आठ एक लाख

आठ हजार ९८६

गोळेश्वर बर्गेवस्ती चार दोन लाख

८९ हजार ३९०

आगाशिवनगर दांगट वस्ती सहा एक लाख

२६ हजार ४४०

सैदापूर सूर्या हॉटेलमागे नऊ एक लाख

सहा हजार ८५०

करवडी, विरवडे येथे सहा २६ हजार

६०० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()