लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे महायुती सरकारने (Mahayuti Government) आगामी विधानसभा निवडणुकांच्या मतांवर डोळा ठेवून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
सातारा : राज्य शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेतील (Ladaki Bahin Yojana) दीड हजार महिलांच्या खात्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, आगामी निवडणुकीच्या (Assembly Elections) तोंडावर या योजनेत सातत्य ठेवण्यासाठी इतर सर्व योजनांचा निधी गोठविल्याची चर्चा सुरू आहे. सरकारच्या या खेळीमुळे इतर योजनांच्या अंमलबजावणीवर मर्यादा येण्याबरोबरच त्याचे लाभार्थी अनुदान व इतर साहाय्यापासून वंचित राहात आहेत.