चिंताजनक! 'या' प्रमुख धरणांतील पाणी पातळी खालावतेय; पाऊस लांबल्यास भीषण टंचाईची भीती

प्रमुख धरणांतील पाणीपातळी कमी झाल्यामुळे ऐन जून महिन्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
Koyna Dam
Koyna DamSakal
Updated on
Summary

पाणीटंचाईमुळे कोयना नदीवर असलेल्या पाणीपुरवठा योजनेवर परिणाम होणार आहे. उरमोडी धरण हे माण, खटाव या दुष्काळी तालुक्‍यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.

काशीळ : जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीपातळी कमी झाल्यामुळे ऐन जून महिन्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांत मिळून अवघा १९.२४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे कोयना धरणात (Koyna Dam) अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने धरण व्यवस्थापनास काटेकोर पाणी नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यात पाऊस लांबल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरणीसाठी शेतजमिनी तयार करून ठेवल्या आहेत.

मात्र, पावसाचे आगमन होत नसल्यामुळे अपेक्षित पेरणीची कामे सुरू होऊ शकलेली नाहीत. धुळवाफेवरील काही ठिकाणी झालेल्या पेरण्या पावसाअभावी अडचणीत आल्या आहेत. जून महिना निम्मा झाला, तरी अजूनही पाऊस नसल्याने प्रमुख धरणाची पाणीपातळी कमी झाली आहे. कोयना, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी या सहा प्रमुख धरणांत उपयुक्त १७.०१ टीएमसी म्हणजेच १२.०८ टक्के पाणी शिल्लक आहे.

Koyna Dam
Karnataka : पाठ्यपुस्तकांतून सावरकर, हेडगेवारांचे धडे वगळले; पुस्तकात फुले, आंबेडकरांचा केला समावेश

पाणीटंचाईमुळे कोयना नदीवर असलेल्या पाणीपुरवठा योजनेवर परिणाम होणार आहे. उरमोडी धरण हे माण, खटाव या दुष्काळी तालुक्‍यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. यामध्ये उरमोडी धरणातील पाण्याची परिस्थिती तुलनेत बरी आहे. कण्हेर, धोम, धोम-बलकवडी या धरणाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. या धरणात अल्प प्रमाणात पाणी शिल्लक आहे. तारळी धरणात पाणी पातळीची परिस्थिती चांगली असून, या धरणात ५२.१० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

Koyna Dam
Satara : दिवसाढवळ्या, रात्री-अपरात्री कोयता-तलवारी नाचवणाऱ्यांचा बंदोबस्‍त करणार का? उदयनराजेंचा संतप्त सवाल

सिंचनासाठी कोयना धरणातून १०५०, धोम धरणातून ५९९, धोम-बलकवडी २५, कण्हेर ४३०, उरमोडी धरणातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातही पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी, नागेवाडी, मोरणा, उत्तरमांड, महू, हातगेघर, वांग या दहा मध्यम प्रकल्पांत २.२३ टीएमसी म्हणजेच २७.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Koyna Dam
पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! 'हा' किल्ला 16 ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद; नियम मोडल्यास होणार कठोर कारवाई

धरणातील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)

धरण पाणीसाठा टक्केवारी

  • कोयना ६.६१ ६.६०

  • धोम २.२० १८.८२

  • धोम-बलकवडी ०.६८ १७.०८

  • कण्हेर १.३७ १४.२७

  • उरमोडी ३.११ ३२.२४

  • तारळी ३.०४ ५२.१०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.