अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी एकास 20 वर्षे सक्तमजुरी

दुकानात जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीवर अत्याचारsakal
Updated on

कऱ्हाड: अवघ्या दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयीतीस वीस वर्ष सक्तमजुरी आणि २२ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व विशेष न्यायाधिश के. एस. होरे यांनी शिक्षा ठोठावली. संजीव बाबुराव चव्हाण (वय ५४) असे झालेल्याचे नाव आहे. 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
चीनच्या लढाऊ विमानांची पुन्हा घुसखोरी; तैवानच्या ADIZ मध्ये दाखल

विशेष सरकारी वकील अ‍ॅड. राजेंद्र सी. शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील एका गावातील पिडीत अल्पवयीन मुलगी २९ जुलै २०२० रोजी दुकानात जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. ती दुकानात जात असताना आरोपी संजीव चव्हाण याने तिच्यावर पाळत ठेवली. ती एकटी असल्याचे पाहून त्याने तिला आपल्या दुचाकीवर घेतले. त्यानंतर तो तिला घेऊन शिवारात गेला. त्याठिकाणी तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पिडीत मुलीच्या आईने कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
सायबर हल्ल्याच्या भीतीने युक्रेनमधील विद्यार्थ्यांनी बंद केले इंटरनेट

तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपज्योती पाटील यांनी आॅगस्ट २०२० रोजी संशयीताला अटक व गुन्ह्याचा तपास केला. पोलिसांनी पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याबरोबर गुन्ह्यात वापरलेले वाहन व पिडीत मुलगी आणि आरोपीचे कपडेही जप्त केले होते. तसेच पिडीत मुलीचा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला होता. तपास पुर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील राजेंद्र शहा यांनी काम पाहिले. खटल्यात नऊ साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत मुलीचा जबाब, तपासी अधिकारी, घटनास्थळ पंचांसह अन्य काही साक्षी या खटल्यात महत्वपुर्ण ठरल्या. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरुन जिल्हा व विशेष न्या. होरे यांनी संशयीतास वीस वर्ष सक्तमजुरी व 22 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतील 10 हजार रुपये पिडीत मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा तसेच या गुन्ह्यात जप्त असलेल्या दुचाकीचा लिलाव होऊन ती रक्कम सरकारी तिजोरीत जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.