सातारा : निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पवारांचा 'करेक्ट कार्यक्रम'

Pratapgad Sugar Factory Election
Pratapgad Sugar Factory Electionesaka
Updated on
Summary

कारखाना बचाव पॅनेलचे नेतृत्व करत असलेल्या पवारांना सभासदांनी नाकारलं आहे.

कुडाळ (सातारा) : प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Pratapgad Sugar Factory Election) संस्थापक सहकार पॅनेलच्या सर्व २१ उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. या निवडणुकीत सभासदांनी सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत एकहाती सत्ता संस्थापक पॅनेलकडे सोपविली. कारखाना बचाव पॅनेलचे नेतृत्व करत असलेल्या दीपक पवारांना (Deepak Pawar) सभासदांनी नाकारले. निवडणूक निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला. या वेळी ‘एकवीस झिरो... सौरभ शिंदे (Saurabh Shinde) हिरो’ या घोषणेने कुडाळ परिसर दणाणून गेला होता.

Pratapgad Sugar Factory Election
'हिजाब बंदी'च्या निर्णयावर केरळचे राज्यपाल खूश, जाणून घ्या कारण

निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे संस्थापक सहकार पॅनेलने सर्व २१ जागा जिंकून एकहाती विजय संपादन केला. या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या नेतृत्वाखालील बचाव पॅनेलने संस्थापक सहकार पॅनेलला आव्हान दिले होते. गेले तीन वर्षे कारखान्याचा गळीत हंगाम बंद असल्याने त्याचा प्रचारा दरम्यान विरोधकांकडून कळीचा मुद्दा करण्यात आला होता. या नाराजीचा फायदा निवडणुकीत होण्याची शक्यता गृहीत धरून बचाव पॅनेलने तयारी केली होती; परंतु सभासदांनी संस्थापक सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना बाराशेहून अधिक मताधिक्याने विजयी करत हा प्रयत्न हाणून पाडला. माजी आमदार (कै.) लालसिंगराव शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठा आजही सौरभ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले. या निवडणुकीत सौरभ शिंदे यांना आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) व सदाशिव सपकाळ आदी प्रमुख नेतेमंडळींनी जाहीर पाठिंबा दिला होता. त्याचाही परिणाम या निवडणुकीत दिसून आला.

Pratapgad Sugar Factory Election
'गांधी परिवारानं काँग्रेसचं नेतृत्व सोडावं अन् दुसऱ्याला संधी द्यावी'

संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी संस्थापक सहकार पॅनेलच्या तीन जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित १८ जागांसाठी एकूण ३२१५ मतदान झाले होते. आज मेढा येथे मतमोजणी करण्यात आली. यामध्ये संस्थापक सहकार पॅनेलच्या १८ पैकी १८ जागा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. निवडणुकीत विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे ः राजेंद्र शिंदे (२२२१), सौरभ शिंदे (२१७९), सुनेत्रा शिंदे (२१३५), आनंदराव मोहिते (२१२१), शांताराम पवार (२११७), अंकुशराव शिवणकर (२१०५), रामदास पार्टे (२१३०), आनंदराव ऊर्फ प्रदीप शिंदे (२१४७), प्रदीप तरडे (२१२२), आनंदराव जुनघरे (२१४४), शिवाजीराव मर्ढेकर (२११५), बाळासाहेब निकम (२११८), गणपत पार्टे (२११०), जयवंत ऊर्फ नानासाहेब सावंत (२०६६), दिलीप वांगडे (२०६९), बाळकृष्ण निकम (२२१३), कुसुम गोसावी (२१७७), विजय शेवते (२२०२). शोभाताई बारटक्के, ताराबाई पोफळे, विठ्ठल मोरे हे तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. दीपक पवार यांच्या बचाव पॅनेलला सरासरी नऊशे मतांचा टप्पा ओलांडता आला. मतमोजणीनंतर सर्व विजयी उमेदवारांनी गुलालाच्या उधळणीत व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढून विजयोत्सव साजरा केला.

निवडणुकीत मतदारांनी आमच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे कारखान्याचा कुटुंबप्रमुख म्हणून माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. आगामी हंगामात प्रतापगड साखर कारखाना सुरू करून शरद पवार यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून हा विश्वास सार्थ ठरवणार आहे.

-सौरभ शिंदे

Pratapgad Sugar Factory Election
योगींच्या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 40 हून अधिक मंत्री घेणार शपथ

आमच्या सर्व उमेदवारांना सुमारे नऊशेहून अधिक सभासदांनी कौल दिला आहे, तरीसुद्धा विजयी पॅनेलच्या उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करतो. विजयी संचालकांना सहकार्य करणार आहे. लवकरात लवकर साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांची गळचेपी थांबवावी हीच आमची इच्छा आहे.

-दीपक पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()