कोरोनातही या तालुक्यात रंगलाय तीनपानी जुगार, पोलिस येता सगळेच झाले गार!

कोरोनातही या तालुक्यात रंगलाय तीनपानी जुगार, पोलिस येता सगळेच झाले गार!
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : घरात सुरू असलेला तीनपानी जुगार अड्डा तालुका पोलिसांनी छापा टाकून उद्‌ध्वस्त केला. छाप्यात जुगार अड्ड्यासाठी घरमालकासह 26 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कऱ्हाड ते ढेबेवाडी रस्त्यावरील कुसूर येथे काल रविवारी (ता. २३) रात्री उशिरा कारवाई झाली. छाप्यात पावणेचार लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. तसेच जुगारातील 60 हजारांची रोख रक्कम, एक लाख 74 हजारांच्या मोबाईलसह एक लाख 37 हजारांच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 26 पैकी 25 जण प्रत्यक्ष जुगार खेळत होते. त्यात तालुक्‍यातील विविध गावच्या लोकांचा सहभाग आहे. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली कारवाई झाली. 

पोलिसांनी सांगितले की, पोलिसांच्या खास बातमीदारातर्फे कुसूर येथील संतोष कळंत्रे याने कुसूरमधील संजय कंक याच्या घरात जुगार अड्डा सुरू केला आहे. त्या घरात तीनपानी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ती माहिती पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांना दिली. त्यांच्याकडून कुसूरला छापा टाकण्याचे नियोजन केले. जुगार प्रतिबंध कायद्यानुसार त्याचे वॉरंट घेण्यात आले. प्राप्त झालेल्या वॉरंटनुसार पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी त्यात 25 जण प्रत्यक्ष जुगार खेळताना आढळून आले. छाप्यात जुगारातील 60 हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे. 

जुगार खेळणाऱ्यांचे 25 मोबईल पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यांची किंमत एक लाख 74 हजार इतकी आहे. जुगार खेळणारांच्या आठ दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्याची किंमत एक लाख 37 हजार आहे. पोलिस निरीक्षक धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईत हवालदार पांडुरंग मोरे, धनंजय कोळी, शशिकांत काळे, सज्जन जगताप, रोहित पवार, अमित पवार, चालक माळी यांनी कारवाईत सहभाग घेतला. 

पोलिसांनी घरमालक संजय कंक यांच्यासह छाप्यात अटक केलेल्यांची नावे अशी : संतोष कळंत्रे (कुसूर), गणेश देसाई, प्रकाश सावंत (रा. जिंती), कैलास देसाई, अभिजित देसाई, निवास पाटील (चौघे, रा. आणे), रत्नाकर देसाई (रा. काळगाव), नवनाथ कुऱ्हाडे, विश्वास कुऱ्हाडे (तिघे रा. तारुख), कैलास खिलारे, प्रशांत पाटील (दोघे रा. आगाशिवनगर), मारुती निवडुंगे, आनंदा चाळके, (दोघे रा. चाळकेवाडी), शरद ताटे, सचिन खंडागळे, अक्षय जाधव (तिघे रा. येरवळे), सुधीर ताईगडे, मयूर ताईगडे, मंगेश ऊर्फ अधिकराव ताईगडे (तिघे रा. तळमावले), वैभव काळे (रा. मालदन), तानाजी घाडगे (रा. काढणे), राजेंद्र चव्हाण (रा. कोळेवाडी), वैभव शिबे (रा. शिबेवाडी), बाजीराव रेंदाळकर (रा. चचेगाव), अजय मर्ढेकर (रा. शास्त्रीनगर, मलकापूर). अटकेतील संशयित छापा टाकला त्यावेळी प्रत्यक्ष जुगाराचा डाव टाकून तीनपानी जुगार खेळत होते. त्या खेळातील 60 हजारांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. त्यांचे 25 मोबाईल व आठ दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.