सातारा : अथणी-रयतकडून एकरकमी २९२५ ऊसदर : श्रीनिवास पाटील

रयत एकमेव कारखाना ठरल्याने जिल्ह्यातील ऊसदराची कोंडीही फुटली
सातारा : अथणी-रयतकडून एकरकमी २९२५ ऊसदर : श्रीनिवास पाटील
सातारा : अथणी-रयतकडून एकरकमी २९२५ ऊसदर : श्रीनिवास पाटीलsakal
Updated on

सातारा : अथणी शुगर्स- रयत साखर कारखान्यातर्फे यंदाच्या गळीत हंगामातील उसास प्रतिटन दोन हजार ९२५ रुपये एकरकमी एफआरपी देण्यात येईल, अशी घोषणा अथणी शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पाटील यांनी केली. दरम्यान, अशी घोषणा करणारा रयत एकमेव कारखाना ठरल्याने जिल्ह्यातील ऊसदराची कोंडीही फुटली आहे.

शेवाळेवाडी- म्हासोली येथील अथणी रयत शुगर्सच्या गळीत हंगामाचा प्रारंभ रयत कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब गरुड, अथणी शुगर्सचे संचालक योगेश पाटील, युनिट प्रमुख रवींद्र देशमुख, शेती अधिकारी विनोद पाटील आदी उपस्थित होते.

सातारा : अथणी-रयतकडून एकरकमी २९२५ ऊसदर : श्रीनिवास पाटील
घोरपडी : वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन मध्ये सोयीसुविधांचा अभाव

श्री. पाटील म्हणाले, ‘‘अथणी शुगर्स- रयतने मागील गळीत हंगामातील गाळपास आलेल्या उसास एफआरपी दोन हजार ८६७ रुपये असताना २९०० रुपये एकरकमी एफआरपीपेक्षा जादा दर दिला. यंदाच्या गळीत हंगामात एफआरपी तीन टप्प्यांत देण्याचे शासनाच्या धोरणांमुळे शेतकरी संभ्रमित होते. मात्र, अथणी शुगर्स- रयतने ऊसउत्पादक शेतकऱ्याची मागणी विचारात घेता एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील हंगामापासून प्रतिटन सवलतीच्या दरात एक किलो साखर दिली जात आहे.’’

अॅड. उंडाळकर म्हणाले, ‘‘ऊसउत्पादक शेतकऱ्याच्या उसाला योग्य व स्पर्धात्मक ऊसदर मिळत आहे. याचे समाधान वाटते. रयत कारखाना अथणी शुगर्सच्या माध्यमातून कर्जमुक्तीकडे वाटचाल करत आहे. पुढील काळात उपपदार्थ निर्मिती करून रयत कारखाना इतर कारखान्याच्या बरोबरीचा व स्पर्धात्मक ऊस दर निश्चितपणे देईल.’’ रवींद्र देशमुख यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.