CM शिंदेंच्या जिल्ह्यातच लाडक्या बहिणीकडून सरकारची फसवणूक; महिलेच्या नावावर तब्बल 30 अर्ज, दांपत्यावर गुन्हा

Ladaki Bahin Yojana : निमसोड येथील एका दांपत्याने ३० वेगवेगळ्या जणांच्या आधारकार्डचा उपयोग करून योजनेसाठी नोंदणी केल्याचे समोर आले आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal
Updated on
Summary

पोलिसांनी दोघांना सकाळीच चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीमध्ये या दांपत्याने ३० अर्ज भरल्याचे समोर आले.

सातारा : राज्य शासनाने मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी (ladaki Bahin Yojana) अर्ज भरताना मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच मोठा घोटाळा समोर आला आहे. एका दांपत्याने ३० वेगवेगळ्या जणांच्या आधारकार्डवर स्वत:चा मोबाईल लिंक करून ३० अर्ज भरल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी दांपत्यावर वडूज पोलिस ठाण्यात (Vaduj Police Station) गुन्हा दाखल झाला असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.