Satara Dams : साताऱ्यातील 'या' 7 धरणांनी गाठला तळ; प्रमुख धरणांत 32 ते 48 टक्के पाणी, कोयनेची काय आहे स्थिती?

अनेक ठिकाणी नदीपात्र कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक गडद होणार आहे.
Satara Water Shortage
Satara Water Shortageesakal
Updated on
Summary

सध्या जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ३२ ते ४८ टक्क्यांपर्यंतच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

सातारा : जिल्ह्यात टंचाईच्या (Satara Water Shortage) झळा गंभीर रूप धारण करत असतानाच मोठ्या लोकसंख्येच्या गावात एकदिवसाआड पाणी मिळत आहे. अशातच प्रमुख धरणांत केवळ ३२ ते ४८ टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे आता यापुढे सिंचन व पिण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यावर मर्यादा येणार आहेत.

अनेक ठिकाणी नदीपात्र कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक गडद होणार आहे. त्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने सतर्क होत बहुतांशी धरणांतील (Satara Dams) पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात पाच प्रमुख धरणे असून, या धरणात आता जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे.

Satara Water Shortage
Harnai Port : जोरदार वाऱ्यामुळं परराज्यातील नौका हर्णै बंदरात; मलपी फास्टर नौकांवर मुख्यमंत्री शिंदे करणार कारवाई?

आतापर्यंत कण्हेर व उरमोडी धरणातून (Kanher and Urmodi Dam) मोठ्याप्रमाणात पाणी दुष्काळी भागाला सोडले गेले, त्यामुळे खटाव तालुक्याकडे दुर्लक्ष झाल्याने पाणी संघर्ष समिती स्थापन करून याविरोधात आवाज उठवावा लागला आहे, तसेच दुष्काळी तालुक्याबरोबरच सातारा, जावळी, महाबळेश्वर, वाई या तालुक्यांतील दुर्गम भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. आगामी महिनाभरात ही टंचाई अधिक तीव्र होणार आहे.

सध्या जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ३२ ते ४८ टक्क्यांपर्यंतच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामध्ये कण्हेर ३७.९२, उरमोडी ३२.५८, धोम बलकवडी ४८.८०, धोम ५४.४८, तारळी ६२.०२ तसेच कोयना धरणात ५८.९५ टक्के पाण्याचा समावेश आहे.

Satara Water Shortage
Koyna Dam : कोयना धरणाच्या वीजनिर्मितीवर मर्यादा; सातारा-सांगलीत दुष्काळी स्थिती, चिपळूणसह एमआयडीसीत पाणीटंचाई

धरणनिहाय पाणीसाठा टीएमसीत..

  • कोयना ६२.०५

  • धोम ५.३६

  • धोम बलकवडी १.८३

  • कण्हेर ३.८३

  • उरमोडी ३.२४

  • तारळी ३.६९

  • येरळवाडी .०.१२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.