कऱ्हाड, सांगली, कोकणातून 45 लाखांची दारू जप्त

उत्पादन शुल्कचा लॉकडाउनमध्ये धडाका; कारवाईत बनावटसहीत देशी-विदेशी दारूही जप्त
liquor
liquoresakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : लॉकडाउनच्या काळात (Corona Lockdown) राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) केलेल्या कारवाईत तब्बल ४५ लाखांची पाच हजार ३३७ लिटर देशी, विदेशीसह बनावट दारू जप्त केलीय. उत्पादन शुल्क विभागाने कऱ्हाड (Karad), पाटण तालुक्यातील सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur) व कोकणच्या (Konkan) सीमावर्ती भागातील गावात केलेल्या १७० कारवाईत १७२ संशयितांना अटक झाली आहे. त्यात निम्म्याहून अधिक कारवाईत दारूची (Alcohol) अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात तस्करीने येणारी दारू रोखण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे.

Summary

कोरोनामुळे मार्चपासून लागलेल्या लॉकडाउनच्या काळात कठीण स्थिती निर्माण झाली होती.

कोरोनामुळे मार्चपासून लागलेल्या लॉकडाउनच्या काळात कठीण स्थिती निर्माण झाली होती. त्या काळात व्यवहार बंद असतानाच दारू विक्रीसह वाहतुकीला बंदी होती. त्याच काळात दारूच्या अवैध वाहतुकीसह गोवा व परराज्यातील दारूची तस्करी वाढली होती. ती रोखण्यासाठी उत्पादन शुल्कनेही जागरूक कारवाया केल्या. लॉकडाउनच्या काळात तब्बल १७० वेगवेगळ्या कारवाया करताना उत्पादन शुल्क विभागाने १७२ जणांना अटक केली आहे. त्या काळात उत्पादन शुल्कने सांगली, कोल्हापूर व कोकणाकडून येणाऱ्या अवैध दारू वाहतुकीला विशेष लक्ष्य केले होते.

liquor
कर्नाटकसह तमिळनाडूत वाघ, बिबट्याच्या नख्यांची विक्री

त्याव्दारे उत्पादन शुल्क विभागाने लॉकडाउनच्या काळात तब्बल १०० कारवाया झाल्याची नोंद आहे. त्यात ४५ लाखांची दारू जप्त केली. १५९ लिटर बनावट दारूचा त्यात समावेश आहे. उत्पादन शुल्कने ३६ वाहने जप्त केली आहेत. त्यामध्ये सहा चार चाकी तर ३० दुचाकीची समावेश आहे. देशी, विदेशी एक हजार ९३४ लीटर, बनावट दारू १५९ लीटर, गोवा बनावटीची ८११ लीटर, ताडी एक हजार १५७ लिटर, हातभट्टीची दारू ३० लिटर तर एक हजार २४६ लिटर दारू तयार करण्याचे रसायनही जप्त केले आहे.

liquor
जिल्हा बॅंकेसाठी 'राष्ट्रवादी'चा मास्टर प्लॅन

दारूसह ताडाचीही तस्करी

अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या देशी विदेशी दारूसोबतच जिल्ह्यात ताडीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. कारवाईत देशी, विदेशी एक हजार ९३४ अवैध दारू सोबतच उत्पादन शुल्कने एक हजार १५७ लिटर ताडीची जप्त केलीय. ती ताडी कोकण, सांगली भागातून आल्याची नोंदही आहे. त्यामुळे गोव्यातून दारू तर कोकणासहीत सांगलीहून येणाऱ्या ताडीची होणारी तस्करी रोखण्याचे यापुढे यंत्रणेसमोर आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.