सातारा ते पुणे महामार्ग दुरुस्‍तीसाठी 50 कोटी : नितीन गडकरी

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भेटीनंतर केली तरतूद
नितीन गडकरी
नितीन गडकरीsakal
Updated on

सातारा : सातारा ते पुणे महामार्गावरील अपघात, दुर्घटना टाळण्यासाठी महामार्ग आणि सेवा रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच जिल्हावासीयांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज कऱ्हाड येथे भेटीदरम्‍यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. शिवेंद्रसिंहराजेंनी केलेल्‍या मागणीनुसार श्री. गडकरी यांनी महामार्ग दुरुस्तीसाठी ५० कोटींची तरतूद करत तीन महिन्यांत महामार्गाची दुरुस्ती करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मंत्री गडकरी यांची शिवेंद्रसिंहराजे यांनी भेट घेत महामार्गाच्‍या अवस्‍थेचे फोटो, निवेदन त्‍यांना सादर केले. चर्चेवेळी शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा ते पुणे महामार्गाच्‍या दुरवस्‍थेविषयी माहिती देत प्रवाशांचा जीव धोक्‍यात असल्‍याचे सांगितले. महामार्ग आणि सेवा रस्त्यांच्या कामाबाबत महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार यांना अनेकदा सूचना करूनही कोणतीही कार्यवाही होत नाही. महामार्गावर सुविधा पुरवल्या जात नसताना टोलवसुली मात्र, सक्तीने केली जाते. याशिवाय टोल नाक्यावर नागरिकांना त्रास देण्‍याचे प्रकार नेहमी होतात.

नितीन गडकरी
महाराष्ट्राची शान वाढली, ‘यूपीएससी’त १२ टक्के मराठी तरुण यशस्वी

आनेवाडी टोलनाक्यावर भ्रष्टाचार झाला असून, हे सर्व गैरप्रकार थांबवणे आवश्यक आहे. या अनागोंदीविरोधात अनेक वेळा आंदोलन केल्‍याचेही त्‍यांनी या वेळी श्री. गडकरी यांना सांगितले. महामार्गाची दयनीय अवस्था दूर करण्‍यासाठी आपण पुढाकार घेण्‍याचे, तसेच संबंधित अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजेंनी या वेळी केली. त्यांच्या मागणीची दाखल घेऊन येत्या तीन ते चार महिन्यांत सातारा ते पुणे महामार्गाची दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन देत तशा सूचना महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्‍या. याचदरम्‍यान त्‍यांनी लवकरच आनेवाडी टोलनाका व्‍यवस्‍थापन बदलण्‍याचे आश्‍‍वासनही शिवेंद्रसिंहराजेंना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.