सातारा - जिल्ह्यात स्टार्टअप उद्योगांना तरुण उद्योजकांकडून पसंती मिळत असून, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (CMEGP) जिल्ह्यात ५२५ नवीन स्टार्टअप उद्योग सुरू झाले आहेत. या उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल २१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यातून या प्रकल्पांना ६.४ कोटींचे अनुदान मिळाले आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या योजनेच्या माध्यमातून रोजगाराची कास धरली आहे.