जिल्ह्यात ६७ टक्के पीक कर्ज वितरण

सातारा ‘डीसीसी’ आघाडीवर; खासगी बँकांची टक्केवारी कमी
67 percent crop loan distribution in Satara district
67 percent crop loan distribution in Satara districtSakal
Updated on

काशीळ - जिल्हा बँक वगळता अन्य बँकांकडून कर्जवितरण संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यात ६७ टक्के पीक कर्ज वितरण झाले आहे. या कर्ज वितरणात जिल्हा बॅंकेने ९३ टक्के पीक कर्ज वितरण करून आघाडी कायम ठेवली आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून अपेक्षित कर्ज वितरण झाले नाही. राष्ट्रीयीकृत बँकांनी २२ तर खासगी बँकांनी अवघे १४ टक्के कर्ज वितरित केले आहे.

पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी वारंवार सूचना देऊनही जिल्हा बँकेचा अपवाद वगळता अन्य बँकांचे कर्जपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. जूनपासून या बँकांकडून कर्ज वितरणाकडे लक्ष दिल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. खरीप हंगामातील पीक कर्जासाठी १९५५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी १३११ कोटी ६५ लाख रुपये म्हणजेच ६७ टक्के पीक कर्ज वितरण झाले आहे.

या वितरणात जिल्हा बँकेचा सर्वांत मोठा वाटा आहे. जिल्हा बँकेस १२५७ कोटी ५४ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. त्यापेक्षा जास्त म्हणजे ११७७ कोटी ३६ लाख रुपयांचे वितरण केले आहे. या बँकेने ९४ टक्के पीक वितरण करत आघाडी कायम ठेवली आहे. राष्ट्रीयीकृत बँका व खासगी बँकांकडून दुर्लक्ष सुरूच आहे.

खासगी बँकांनी शेतकऱ्यांकडे लक्ष दिलेच नसल्याचे स्पष्ट होत आहे. या बँकांना २३५ कोटी ६६ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३२ कोटी एक लाख रुपयांचे म्हणजेच १४ टक्के कर्ज वितरण झाले आहे. खरिपामध्ये सप्टेंबरअखेर कर्ज वितरण केले जाते. यामुळे पुढील तीन महिन्यांत राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंका किती कर्ज वितरण करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘राष्ट्रीयीकृत’मध्ये महाराष्ट्र बँक आघाडीवर...

राष्ट्रीयीकृत बँकांना ४५८ कोटी ६३ लाखांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी या बँकांनी १०० कोटी ७० लाख म्हणजे २२ टक्के कर्ज वितरित केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांत बँक ऑफ महाराष्ट्रने शेतकऱ्यांकडे लक्ष दिल्याचे दिसते. या बँकेस १०२ कोटी ५१ लाखांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४९ कोटी १४ लाख म्हणजेच ४८ टक्के कर्ज वितरित केले आहे. इतर राष्ट्रीयीकृत बँकांकडून ३५ टक्‍क्यांपेक्षा कमी कर्ज वितरण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.