''गणेशोत्सवात आवाजामुळे धोकादायक इमारतींमुळे काहीही होऊ शकते. त्यामुळे त्या इमारती उतरवून घेण्याची आम्ही पालिकेस मागणी केली आहे.''
कऱ्हाड : धोकादायक इमारती उतरविण्याचे शासनाचे निर्देश असताना शहरातील तब्बल ६८ धोकादायक इमारती तशाच उभ्या आहेत. त्या इमारतींवर कारवाईपेक्षा पालिकेने निव्वळ कागदोपत्री नोटिसांची कार्यवाही केली आहे. त्या इमारती गणेशोत्सवातील (Karad Ganeshotsav) आवाजामुळे धोक्याच्या ठरत आहेत.