धोका कायम! साताऱ्यात 24 तासात 18 बाधितांचा मृत्यू, तर 759 जणांना डिस्चार्ज

coronavirus i
coronavirus iesakal
Updated on

सातारा : जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा (corona patient) आलेख जून महिन्यात हजाराच्या खाली आला असला, तरी तो आणखी कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी ग्रामीण भागावर (Rural areas) लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 788 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 18 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (Health Officer) दिली. (759 Corona Patients Were Discharged From Satara District Hospital Today)

Summary

जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख जून महिन्यात हजाराच्या खाली आला असला, तरी तो आणखी कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 24 (8379), कराड 195 (26045), खंडाळा 32(11537), खटाव 86 (18902), कोरेगांव 77 (16291), माण 86 (12795), महाबळेश्वर 3 (4214), पाटण 38 (8091), फलटण 74 (27961), सातारा 139 (39185), वाई 25 (12406) व इतर 9 (1252) असे आजअखेर एकूण 187058 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

coronavirus i
महाबळेश्‍वरात आढळलेल्या 'निपाह'वर सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 1 (188), कराड 3 (766), खंडाळा 0 (147), खटाव 2 (474), कोरेगांव 3 (376), माण 1(252), महाबळेश्वर 0 (44), पाटण 2 (191), फलटण 1 (278), सातारा 3 (1196), वाई 2 (327) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4239 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

coronavirus i
सातारा : बाधितांची संख्या घटली; जाणून घ्या पाॅझिटिव्हीटी रेट

जिल्ह्यात आज 759 नागरिकांना डिस्चार्ज

सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालय, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 759 जणांना आज घरी सोडण्यात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण (Dr. Subhash Chavan) यांनी दिली.

  • एकूण नमूने – 998630

  • एकूण बाधित – 187058

  • घरी सोडण्यात आलेले – 175191

  • मृत्यू - 4239

  • उपचारार्थ रुग्ण - 8437

759 Corona Patients Were Discharged From Satara District Hospital Today

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()