Gas Cylinder च्या स्फोटात कऱ्हाड हादरलं! दोन मुलांसह सात जण होरपळून जखमी, पाच घरांचं 20 लाखांचं नुकसान

यात दोन लहान मुलांसह सात जखमी झाले, तर पाच घरांचे २० लाखांहून अधिक नुकसान झाले.
Gas Cylinder Explosion Karad
Gas Cylinder Explosion Karadesakal
Updated on
Summary

अतिरिक्त पोलिस अधीक्षक दलाल यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी सर्व स्थितीची पाहणी केली.

कऱ्हाड : पहाटेची साखरझोप संपून उजडायला लागले होते, त्याचवेळी सहा वाजून ५१ मिनिटांनी कऱ्हाडच्या हद्दवाढ भागातील मुजावर कॉलनी, शांतीनगर, खराडे, रेठरेकर, शिक्षक आदी कॉलन्यांसह छत्रपती शिवाजी स्टेडियमचाही परिसर घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटाने (Gas Cylinder Explosion) हादरला.

यात दोन लहान मुलांसह सात जखमी झाले, तर पाच घरांचे २० लाखांहून अधिक नुकसान झाले. पोलिसांसह (Police) स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरीफ मुबारक मुल्ला, सुलताना शरीफ मुल्ला, झोया शरीफ मुल्ला, राहत शरीफ मुल्ला असे स्फोट झालेल्या घरातील जखमींची नावे आहेत. त्यात शरीफ (वय ३५) ४० टक्के, सुलताना (३२) ६० टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात (Krishna Hospital) उपचार सुरू आहेत.

Gas Cylinder Explosion Karad
Tiger Claw Case : वाघाच्या पंजाप्रकरणी 'बिग बॉस'च्या स्पर्धकाला अटक; अनेक सेलिब्रिटी अडचणीत, अभिनेत्यांच्या घरांची झडती

त्यांची ११ वर्षांची मुलगी झोया आणि आठ वर्षांचा मुलगा राहतही जखमी आहे. ते भाजले असले तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याशेजारी अशोक पनवार राहतात. स्फोटामुळे त्यांच्या घराला दणका बसला. त्या घराची भिंत कोसळली. त्या भिंतीखाली सापडल्याने त्या घरातील श्री. पवार यांच्यासह त्यांची पत्नी शैलजा व अन्य एक दत्तात्रय खिलारे जखमी आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक दलाल यांनी घटनास्थळी दुपारी भेट दिली. त्यावेळी त्यांनी सर्व स्थितीची पाहणी केली. मुजावर कॉलनी व शांतीनगरच्या हद्दीवरील घरात सकाळी सहा वाजून ५१ मिनिटांनी जबरदस्त स्फोट झाला. मुजावर कॉलनीतील शिरफ मुल्ला यांच्या घरात स्फोटाची घटना झाली. त्यात मुल्ला यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगी व मुलगा जखमी आहे. त्या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती, की मुल्ला यांच्या घराची सिमेट काँक्रिटची भिंत फुटून समोरच्या घरावर आदळली.

Gas Cylinder Explosion Karad
Mysore Dasara : जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सवाची जंबो सवारीने सांगता; अभिमन्यू हत्तीने वाहून नेली 750 किलो सोन्याची अंबारी

समोर साईनाथ डवरी राहतात. मोलमजुरी करून जगणारे ते कुटुंब. त्यांच्या घरावर भिंत आदळल्याने त्या घराचे १०० टक्के नुकसान झाले आहे. त्यांच्या घरातील सोफा, बॅरेल, संसारोपयोगी वस्तू सारे काही सिमेंटच्या भिंतींच्या ढिगाऱ्याखाली दबून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. स्फोटाने घराच्या मागील अस्लम बाबूलाल पठाण यांचे स्वयंपाकघरही मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले आहे.

मुल्ला यांच्या शेजारी राहणारे अशोक पवार यांच्या तीन महिन्यांपूर्वी बांधलेल्या सिमेंट काँक्रिटच्या इमारतीची भिंत स्फोटाच्या हादऱ्याने कोसळली. त्या खाली सापडलेले तिघे जखमी आहेत. पाच घरांचे २० लाखांहून जास्त नुकसान झाले आहे. जखमींचा जबाब घेऊन पोलिसांचा तपास सुरू राहणार आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Gas Cylinder Explosion Karad
Koyna Dam Water : पाणी टंचाईचं गडद संकट! कोयना धरणातून पुरवठ्यात 10 टक्के कपात; टेंभू, ताकारी, आरफळ योजनांवर मोठा परिणाम

रोजंदारीवरील कुटुंबे रस्त्यावर

मुल्ला यांच्या घरासमोर राहणारे डवरी कुटुंब रोजदांरीवर जगते. साईनाथ डवरी, त्यांची पत्नी उषा व मुलगा रोहित असे तिघे तेथे राहतात. त्यांच्या घराचे १०० टक्के नुकसान झाले आहे. ते कुटुंबच रस्त्यावर आले आहे. डवरी कुटुंब आज त्यांच्या तेथून जवळच राहणाऱ्या त्यांच्या चुलत भावाकडे वास्तव्यास गेले आहे. दोन्ही रोजंदारीवरील कुटुंब स्फोटाने रस्त्यावर आली आहेत.

Gas Cylinder Explosion Karad
Govind Pansare Case : पानसरे हत्या प्रकरणाला वेगळं वळण; संशयित फरार विनय पवारसह पत्नीचे Photo साक्षीदाराने न्यायालयात ओळखले

पुण्याची पथकेही दाखल

स्फोटाचा तांत्रिक व रासायनिक लॅबकडून अभ्यास होणार आहे, त्यासाठी पुण्याचे फॉरेन्सिक लॅबसह अतिरेकी विरोधी पथकही येथे दाखल झाले आहे. त्यांनी तेथील काही नमुने तांत्रिक व रासायनिक तपासणीसाठी ताब्यात घेतली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.