Satara : शिवरायांच्या शौर्याच्या पाऊलखुणा पाहण्याची संधी;वाघनखे शुक्रवारी साताऱ्यात

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे तीन वर्षांसाठी लंडनहून भारतात आणल्यानंतर पहिल्या टप्प्यात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात येत्या शुक्रवारी ठेवली जाणार आहेत.
Satara
Satara sakal
Updated on

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे तीन वर्षांसाठी लंडनहून भारतात आणल्यानंतर पहिल्या टप्प्यात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात येत्या शुक्रवारी ठेवली जाणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर संग्रहालयातील वाघनखाचं दालन, तख्त, शस्त्र व नाणी विभागाचे काम पूर्ण झाले आहे. ऐतिहासिक वाघनखे संग्रहालयात आणल्यानंतर शिवरायांच्या शौर्याच्या पाऊलखुणा पाहण्यासाठी शिवप्रेमींकरिता दालन खुले होणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत शिवप्रेमींना संग्रहालय खुले ठेवले जाणार आहे.

वाघनखे पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी, महिला बचतगट व शेतकरी यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच दुपारच्या सत्रात पुढील दिवसांसाठी आगाऊ आरक्षण करुन पाहता येणार आहे. त्‍यासाठी प्रतीव्यक्‍ती दहा रुपये शुल्‍क आकारण्यात येणार आहे.

  • पहिल्या टप्प्यात तख्त, शस्त्र, वस्त्र, चित्र विभाग सुरू होणार

  • लंडनहून आणलेल्या वाघनख्यांसाठी स्वतंत्र दालन

  • ऐतिहासिक शस्त्रांचे होणार संवर्धन

  • शिवछत्रपतींच्या जीवनावरील चित्रफीत दाखविली जाणार

ऐतिहासिक काय पाहता येणार?

तलवारी, कट्यार, बरचे, भाले, खंजीर, चिलखतं, अंकुश, परशू, तोफगोळे, गुप्ती, रणशिंग, बिचवा, धनुष्यबाण, बंदुकांचे प्रकार, अंगरखा, बख्तर, दारूच्या पुड्याचा शिंगाडा, तुमान, संगिनी, पगड्या, ढाली, आच्छादने यासह विविध शिवकालीन शस्त्रास्त्रे पाहावयास मिळणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात येत्या शुक्रवारी वाघनखे आणली जाणार आहेत. वाघनखांसाठी असणाऱ्या स्वतंत्र दालनासह तख्त, शस्त्र व नाणी विभागाचे काम पूर्ण झाले आहे. यासह वस्त्र, संकिर्ण, चित्र विभागाची दालनांची कामे अंतिम टप्यात आले आहे.

- प्रवीण शिंदे, अभिरक्षक, छत्रपती शिवाजी संग्रहालय,

काम पूर्ण झालेली दालने: १) तख्त २) शस्त्र

३) वाघनखे ४) नाणी विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com