सातारा : जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कारवायांचा धडाका

निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षकांचा निर्णय; उपविभागनिहाय शिबिरांचे आयोजन
सातारा : जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कारवायांचा धडाका
Updated on
Summary

निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षकांचा निर्णय; उपविभागनिहाय शिबिरांचे आयोजन

सातारा : आगामी निवडणुकांच्या(election) पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील(satara) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी(Law and order) पोलिस दलाने पावले उचलण्यास सुरवात केली. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल(sp ajaykumar bansal) यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील पोलिस उपविभागीय पातळीवर प्रतिबंधात्मक कारवायांची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपद्रवी व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे पोलिसांचे काम महत्त्वाचे असते. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहतो. त्यांच्या एकूणच कारवाया थंडावतात. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य टिकून राहते. सीआरपीसी कलम ११० व १०७ नुसार अशा बहुतांश कारवाया होत असतात.

सातारा : जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कारवायांचा धडाका
मुंबई - गोवा महामार्गावर लागल्या वाहनांच्या रांगा

पूर्वी या कारवाया करण्याचे काम हे केवळ महसूल विभागाकडे होते. त्याकडे महसूल विभागाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याने या कारवाया केवळ दिखाव्याच्या ठरत होत्या. अनेकदा त्यात विलंब व्हायचा, याचा विचार करून शासनाने काही वर्षांपूर्वी प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे अधिकार हे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या निरीक्षकाला प्रदान केले. पोलिसांना या कारवायांची गरज आणि प्रभाव माहिती असल्यामुळे तेव्हापासून उपद्रवी लोकांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून प्रतिबंधात्मक कारवाया सुरू करण्यात आल्या.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर जिल्ह्यातील तब्बल ८७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या. त्यामुळे या कालावधीतील गावोगावी वादाचे प्रसंग निर्माण होतात. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे अधिकार असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ यांना जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस उपविभागनिहाय शिबिराचे आयोजन करून प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे निर्देश दिले. आगामी काळातही जिल्ह्यात महत्त्‍वाच्या असलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पुन्हा अशा शिबिरांचे नियोजन करून प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे निर्देश अधीक्षक बन्सल यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ यांनी या उपविभागीय पातळीवर या शिबिरांचे नियोजन केले आहे.

पाटण उपविभागातील पाटण, मल्हारपेठ, कोयनानगर, ढेबेवाडी या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रस्तावांवर २७ डिसेंबरला मल्हारपेठ येथे शिबिर झाले. आज कऱ्हाड उपविभागातील कऱ्हाड शहर, कऱ्हाड ग्रामीण, तळबीड व उंब्रज पोलिस ठाण्यांचे शिबिर कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात होत आहे. फलटण उपविभागात फलटण शहर, फलटण ग्रामीण, खंडाळा, शिरवळ व लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कारवाया होणार आहेत, दहिवडी व कोरेगाव उपविभागातील पोलिस ठाण्यांचे एकत्रित शिबिर हे पुसेगाव येथे होणार आहे. सातारा उपविभागातील पोलिस ठाण्यांचे शिबिर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामध्ये होणार आहे. शिबिरांमध्ये ८०० पर्यंत प्रतिबंधात्मक कारवाया होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.