Revenue Department : महसूल, पोलिस विभागातच 'लाचखोरी' उदंड; क्‍लास वन अधिकाऱ्यांसह 20 जणांवर कारवाई

सातारा लाचलुचपत विभागाने (Satara Anti Corruption Bureau) गेल्या वर्षात सापळे रचून २० लाचखोरांवर कारवाई केली आहे.
Satara Anti Corruption Bureau
Satara Anti Corruption Bureauesakal
Updated on
Summary

लाचलुचपत विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राजेश वाघमारे यांनी ‘क्लास वन’ अधिकाऱ्यावर कारवाई केली. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षी कमी कारवाया झाल्या आहेत.

सातारा : सातारा लाचलुचपत विभागाने (Satara Anti Corruption Bureau) गेल्या वर्षात सापळे रचून २० लाचखोरांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये महसूल विभागाने ‘नंबर वन’ मिळवला असून, पोलिस, नगरविकास, ग्रामविकास, शिक्षण, कामगार विभागाने दुसरा क्रमांक मिळवत लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे एका ‘क्‍लास वन’ अधिकाऱ्यांवर (Class One Officers) कारवाई करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहेत. त्यामध्ये महसूल विभाग (Revenue Department) आघाडीवर आहे. महसूल विभागातील सर्वाधिक ९ जणांना अटक करण्यात आली असून, त्या खालोखाल पोलिस, नगरविकास, ग्रामविकास, शिक्षण, कामगार विभागातील प्रत्येकी एकाला अटक केली आहे. लाचलुचपत विभागाच्या १४ कारवायांत २० जण जाळ्यात अडकले आहेत.

Satara Anti Corruption Bureau
'वंचित' बरखास्त करून प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं, अध्यक्षपदासह माझं मंत्रिपद देईन; आठवलेंची खुली ऑफर

तक्रारींसाठी साधा संपर्क

लाच मागणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेक पर्याय दिले आहेत. १०६४ हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. त्याचसह दूरध्वनी ०२१६२-२३८१३९ येथे संपर्क साधावा, तसेच एसीबी महाराष्ट्र नावाने संकेतस्थळावरही तक्रार करू शकता, असे अधीक्षक वाघमारे यांनी सांगितले.

Satara Anti Corruption Bureau
'यल्लमा देवी यात्रेतील प्राणी हत्या रोखा'; नवस फेडण्याच्या बहाण्याने हजारो कोंबडी, बकरी, मेंढ्यांचा दिला जातोय बळी

लाचखोर अधिकाऱ्यांवरील कारवाई

  • वर्ष २०२३

  • क्‍लास वन १

  • क्‍लास टू २

  • क्‍लास थ्री १४

Satara Anti Corruption Bureau
खासदार उदयनराजेंनी घेतली काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्‍यक्षांची भेट; राजकीय चर्चांना उधाण, भेटीत काय घडलं?

दृष्टिक्षेपात कारवाया

  • २०१८ - २९

  • २०१९ - २७

  • २०२० - २३

  • २०२१ - २०

  • २०२२- २०

आव्हान कायमच...

वर्ग तीनमधील लोकसेवकांचे लाचखोरीत प्रमाण जास्त असून, १४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दोन ‘क्‍लास टू’ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. क्‍लास वन अधिकाऱ्यांवर कारवाई कमी होत असल्याची तक्रार असते; पण गेल्या वर्षी एका ‘क्‍लास वन’ अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. खासगी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राजेश वाघमारे यांनी ‘क्लास वन’ अधिकाऱ्यावर कारवाई केली. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षी कमी कारवाया झाल्या आहेत. नवीन अधिकाऱ्यांपुढे कारवाया करण्याचे आव्हान आहे.

Satara Anti Corruption Bureau
महाबळेश्‍‍वरात अनधिकृत बांधकामांवर पोलिस फौज फाट्यासह प्रशासनानं फिरवला बुलडोझर; बांधकाम व्यावसायिक-मालकांचे धाबे दणाणले

शासकीय कामासाठी कोणी लोकसेवक लाचेची मागणी करीत असेल, तर तत्काळ मला ९७६३४०६५०० व ९५९४५३११०० या मोबाईल क्रमांकावर कधीही फोन करा. जिल्ह्यातील विविध गावांतील व्हॉटसॲप ग्रुपवर माझा मोबाईल नंबर समाविष्ट करा.

- राजेश वाघमारे, पोलिस उपअधीक्षक, एसीबी, सातारा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.