पाटण (जि. सातारा) : वनकुसवडे पठारावरील कारवट गावानजीक शनिवारी दुपारी एकच्या सुमारास पाटण आगाराच्या एसटी बसचे चाक निखळून अपघात झाला. या अपघातामध्ये बसमधील 12 प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये एसटीचे चालक आणि वाहकांचाही समावेश आहे. जखमी प्रवाशांना पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत एसटी आगार आणि ग्रामीण रुग्णालय तेथून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी एक वाजता पाटण आगारातून सुटलेल्या पाटण ते अवसरी एसटी बस (एमएच 12 इएफ 6845) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास काठी अवसरी येथून परतताना कारवट गावाच्या हद्दीत एसटीचे चाक निखळून पडले. त्यामुळे एसटी रस्ता सोडून बाजूच्या खोल नाल्यामध्ये जाऊन धडकली.
या अपघातात अनुसया शिंदे, पारूबाई शिंदे, यशोदा शिंदे, विलास पवार (सर्व रा. कारवट), शोभा निकम शैलेश देसाई (दोघे रा. म्हारवंड), जगाबाई यमकर, धोंडीबा यमकर (दोघे रा. जोगी टेक), ऋषिकेश निकम, प्रकाश बावधने (दोघे रा. काठीटेक) आणि एसटीचे चालक उत्तम सूर्यवंशी (रा. घाणव) व वाहक शराफत शेख हे जखमी झाले आहेत. जखमींपैकी जगाबाई यमकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झालेली नाही.
सातारा तालुक्यातील 54 जणांच्या जमिनी सरकारजमा हाेण्याच्या मार्गावर आहेत
रेल्वेमंत्री असताना लालूप्रसाद यादवांनी हेच केले हाेते; कऱ्हाडात चर्चा
आई उदे ग अंबे उदेचा औंधला जयघोष; रथोत्सव उत्साहात
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.