भावांनो, वाहने सावकाश चालवा! अपघातात मुक्या प्राण्यांचा जातोय 'जीव'

रस्ते अपघातात 40 दिवसांत चार जणांचा बळी
Animal Accident
Animal Accidentesakal
Updated on

कलेढोण (सातारा) : रस्ते अपघातांमुळे (Accident) ४० दिवसांत चार जणांचे बळी घेतलेला महामार्ग आता पक्षी, वन्य प्राण्यांच्याही मुळावर उठला आहे. भरधाव वेग, कर्कश हॉर्नमुळे भेदरलेले प्राणी, पक्ष्‍यांचे रस्ता ओलांडताना मृत्यू होत आहेत. मायणीतून मल्हारपेठ-पंढरपूर मार्ग (Malharpeth-Pandharpur Road) व मायणी-म्हसवड मार्गावर (Mayani-Mhaswad Road) रस्त्याकडेला हे प्राणी, पक्षी मृत्यू झालेल्या अवस्थेत आढळत आहेत. त्यासाठी वन विभाग (Forest Department), पक्षिप्रेमींनी जनजागृती करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

Summary

पक्षी सौंदर्यामुळे नावाजलेले मायणीचे आश्रयस्थान आता पक्षी संवर्धन झालेले आहे.

पक्षी सौंदर्यामुळे नावाजलेले मायणीचे आश्रयस्थान (Mayani Bird Sanctuary) आता पक्षी संवर्धन झालेले आहे. येथील वनसंपदा, प्राणी, पक्षी सौंदर्यामुळे या आश्रयस्थानास शासकीय दप्तरी दर्जा निर्माण झाला आहे. येथे दिसणारे मोरांचे थवे, पाणपक्षी, पाणथळ पक्षी, वन्यजीव, पाण्यातील जलचरांमुळे या ठिकाणास महत्त्‍व प्राप्त झाले आहे. मात्र, सुरक्षित आश्रयस्थानाच्या याच भागातून मल्हारपेठ-पंढरपूर हा राज्यमार्ग व मायणी-म्हसवड असे दोन मार्ग जातात. यातील मल्हारपेठ-पंढरपूर मार्गावर विखळे ते चितळी या १५ किलोमीटरच्या अंतरात ४० दिवसांत अनेक भीषण अपघात झाले आहेत.

Animal Accident
साताऱ्यातून पर्यटकांसाठी मोठी बातमी; कास पठार 25 ऑगस्टनंतर सुरु

हे अपघात वाहनांच्या अमर्यादित वेगामुळे झाले असून, त्यात चार जणांचा बळी गेला आहे. बेफान वेगामुळे माणसांच्या जिवांशी खेळणारे वाहनचालक पक्षी-प्राण्यांवरही गाडी चालवत निसर्गाचे मोठे नुकसान करीत आहेत. त्यासाठी वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वाहनचालकांच्यात जागृती करण्याची गरज भासत आहे. विशेषत: सकाळच्या वेळेत बेफान वेगात चालविणारे वाहनचालक अपघातास कारणीभूत ठरत आहेत. यासाठी वन विभाग, सामाजिक संस्थांकडून मायणी-म्हसवड फाट्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.