ताब्यात घेतलेल्या संशयितांना पाटण न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेश वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
सातारा : मोराच्या (Peacock) अंगावरची पिसे उपसून काढत त्याबाबतचा केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत मध्य प्रदेश (Madhya Pradesh) येथून पसार झालेल्या दोघांना सातारा वनविभागाने पाटण तालुक्यातील बेलवडे खुर्द या गावाजवळ अटक केली.
अटकेतील त्या दोघांना मध्य प्रदेश वनविभागाच्या (Satara Forest Department) ताब्यात देण्यात आले आहे. मध्य प्रदेश येथील रिठी वनपरिक्षेत्रात राहणाऱ्या अतुल (पूर्ण नाव नाही) याने एका युवतीसोबत वनक्षेत्रात एक मोर पकडला होता. या मोराची नंतरच्या काळात त्याने पिसे उपसून काढत त्याचा व्हिडिओ तयार केला होता.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याठिकाणच्या वनकर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला. वनकर्मचारी शोध घेत असल्याचे समजल्यानंतर अतुल हा युवतीसोबत त्याठिकाणाहून पसार झाला होता. पसार असणारा अतुल सातारा जिल्ह्यात असल्याची माहिती रिठी वनविभागास मिळाली होती. यानुसार त्यांनी उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांना याची माहिती दिली.
यानुसार त्यांनी, तसेच सहायक उपवनसंरक्षक महेश झांजुर्णे यांनी पाटणचे वनक्षेत्रपाल, कर्मचारी, फिरत्या पथकास माहिती देत संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. यानुसार बेलवडे खुर्द गावाजवळून या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्याची माहिती मध्य प्रदेश वनविभागास देण्यात आली. ताब्यात घेतलेल्या संशयितांना पाटण न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेश वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.