सातारा जिल्ह्यात 324 वाहनांवर कारवाई

police
policeesakal
Updated on
Summary

गेल्या काही दिवसांत महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

सातारा: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३२४ खासगी वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा व कऱ्हाड, जिल्हा वाहतूक विभाग, महामार्ग पोलिस यांनी पाच पथकांची नेमणूक करून विशेष तपासणी मोहिम राबवत दोषी वाहनांवर कारवाई केली.

police
सातारा ते पुणे महामार्ग दुरुस्‍तीसाठी 50 कोटी : नितीन गडकरी

गेल्या काही दिवसांत महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा वाहनचालक मद्यपान, मोबाईलवर बोलत वाहने चालविताना आढळून आले. या प्रकाराला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने विशेष मोहिम राबवत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई केली. या वेळी विनापरवाना अथवा परवान्यांच्या अटींचा भंग करून वाहने चालविणे, टप्पा वाहतूक, खासगी बसमधून अवैधपणे प्रवासी वाहतूक करणे, अवैध माल वाहतूक करणे, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, रिफ्लेक्‍टर, इंडिकेटर, वायपर नसणे, वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे केलेले बदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, मोबाईलवर बोलणे, मद्यपान करून वाहने चालविणे यांसह वाहन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.

police
सातारा रस्त्यांवर भटक्या जनावरांमुळे वाहतूकीस अडथळा

दरम्यान, या कारवाईत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा यांनी २४७ वाहने, कऱ्हाड उपप्रादेशिक कार्यालयाने ७७ वाहनांवर कारवाई केली. याचबरोबर जिल्हा वाहतूक शाखेने ४२४ तर महामार्ग पोलिसांनी ७३२ वाहनांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही मोहीम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली गेली. मोहिमेत आफ्रीन मुलाणी, सहायक मोटार वाहन निरीक्षक सुप्रिया गावडे, गजानन गुरव, जाकीउद्दीन बिरादार, सुरेश माळी, दिग्विजय जाधव, मारुती पाटील, योगेश ओतारी, तर कऱ्हाड कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर विश्‍वासराव, शिरीष पोकळे याचबरोबर सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल शेलार, दत्तात्रेय गुरव व वाहतूक कर्मचारी सहभागी झाले होते.

‘‘वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर विशेष तपासणी मोहिम राबवत कारवाई केली आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून वाहन परवाना व इतर सर्व कागदपत्रे जवळ बाळगण्याची आवश्‍यकता आहे.’’

- विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.