मोरगिरी (सातारा) : ग्रामपंचायतींचा २०२०-२१ चा (Gram Panchayat) वार्षिक आराखडा मंजूर करणे गरजेचे असल्याने विशेष बाब म्हणून शासनाने ऑनलाइन ग्रामसभा (Online Gramsabha) घेण्यास मान्यता दिली. परंतु, पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील अपवाद वगळता बहुतांश ग्रामपंचायतींच्या ऑनलाइन ग्रामसभा झाल्याच नाहीत. शासनाने दिलेल्या आदेशानुसार ग्रामसभा घेणे बंधनकारक असताना त्याकडे ग्रामपंचायतींनी पाठ फिरवली आहे. ऑनलाइन ग्रामसभा घेण्यास कुचराई करणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (Action Will Be Taken Against Gram Panchayat Which Do Not Hold Online Gram Meeting Satara Marathi News)
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने शासनाने ग्रामसभा स्थगित केल्या होत्या. त्यामुळे ऑनलाइन ग्रामसभा घेण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जाहीर केला.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने शासनाने ग्रामसभा स्थगित केल्या होत्या. त्यामुळे ऑनलाइन ग्रामसभा घेण्याचा निर्णय सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा (Chief Executive Officer Vinay Gowda) यांनी जाहीर केला. कोरोनाच्या विळख्यात (Coronavirus) ग्रामसभा अडकल्याने अनेक निर्णय रखडले होते. स्वातंत्र्य दिन (Independence Day), प्रजाकसत्ताक दिन (Republic Day), महाराष्ट्र दिन या दिवशी ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. २०२१ चा वार्षिक आराखडा मंजूर करणे गरजेचे असल्याने विशेष बाब म्हणून शासनाने ऑनलाइन ग्रामसभेस मान्यता दिली होती. ग्रामसभा घेण्यास कुचराई करणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचा इशाराही श्री. गौडा यांनी दिली होता.
मागील आर्थिक वर्षात पंचायतीने केलेले काम व चालू होणाऱ्या आर्थिक वर्षातील कामाबद्दलची माहिती सरपंचाने स्वतः किंवा पंचायतीचा सचिव ग्रामसभेचा सदस्य असल्यास त्याने अगर पंचायतीच्या हजर असलेल्या सभासदांपैकी एखाद्या सभासदाने ग्रामसभेला देणे आवश्यक असते. त्यानंतर ग्रामसभेने ज्या सूचना केलेल्या असतील, त्यांचा विचार करून ग्रामपंचायतीने कारभार करणे अपेक्षित आहे. मात्र, शासनाने दिलेल्या आदेशानुसार ग्रामसभा घेणे बंधनकारक असताना त्याकडे मोरणा विभागातील बहुतांश ग्रामपंचायतींनी पाठ फिरवलेली आहे. ऑनलाइन ग्रामसभा घेण्यास कुचराई करणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ऑनलाइन ग्रामसभा ३१ मेपर्यंत घेण्याचे आदेश शासनाने ग्रामपंचायतीला दिले होते. ग्रामीण भागात नेटवर्क प्रॉब्लेम व कोरमअभावी सभा तहकूब करावी लागली. माझ्याकडे अधिभार असलेल्या पेठ शिवापूर आणि मोरगिरी गावच्या ऑनलाइन ग्रामसभा नंतर झाल्या.
-एस. एन. भोसले, ग्रामसेवक, पेठ शिवापूर, मोरगिरी
ऑनलाइन ग्रामसभा घेण्यासाठी शासनाने ग्रामपंचायतीला सूचना केल्या होत्या. परंतु, कुसरुंड (ता. पाटण) ग्रामपंचायतीने शासनाच्या ऑनलाइन ग्रामसभा आदेशाला केराची टोपली दाखवून ती ग्रामसभा घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. ते दुर्दैवी आहे.
-प्रदीप कांबळे, ग्रामस्थ, कुसरुंड
Action Will Be Taken Against Gram Panchayat Which Do Not Hold Online Gram Meeting Satara Marathi News
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.